Discount Offers on Maruti Car: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीचे कार देशभरात खूप लोकप्रिय आहेत. यातच ऑटो मार्केटमध्ये कारवर शानदार डिस्काउंट ऑफर्स सुरू झाल्या आहेत. यात मारुती सुझुकीच्या कारचाही समावेश आहे. मारुती या जुलै महिन्यात आपल्या एका कारवर डिस्काउंट ऑफर देखील देत आहे, त्यामुळे जर तुम्ही देखील लवकरच नवीन मारुती कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय एसयूव्हीवर बंपर सूट देत आहे. मारुती सुझुकीने जून २०२३ मध्ये 5-डोर जिमनी लाँच केल्यापासून, 4×4 ला बाजारात पकड मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. मे महिन्यात केवळ २७४ कारची विक्री झाली. यानंतर मारुती सुझुकीने सवलत वाढवून २.५ लाख रुपये केली आहे.

(हे ही वाचा : Ertiga, Carens चे धाबे दणाणले! एकेकाळी हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारी ‘ही’ कार नव्या अवतारात देशात दाखल होणार, किंमत…)

कंपनी जिमनी गाड्या रिकामी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात कंपनीकडून दीड लाख रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात होते. मारुती सुझुकीने जुलै महिन्यात ती वाढवून २.५ लाख रुपये केली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, टॉप मॉडेल, अल्फा वर २.५ लाख रुपयांपर्यंत कमाल सूट मिळत आहे. ही ऑफर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही आवृत्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि यामध्ये एक लाख रुपयांची रोख सवलत तसेच १.५ लाख रुपयांची जाहिरात ऑफर समाविष्ट आहे जी फक्त मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

एंट्री-लेव्हल ट्रिम, Zeta, मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स ग्राहकांसाठी १ लाख रुपयांची रोख सवलत आणि रु. १ लाख अतिरिक्त सूट देत आहे. हे फायदे Zeta मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारांसाठी लागू आहेत.

मारुती सुझुकी जिमनीचे स्पेसिफिकेशन्स

जिमनीकडे १,४६२cc नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे निष्क्रिय स्टार्ट-स्टॉप फंक्शन आहे. त्याचे आउटपुट १०३ bhp आणि १३४.२ Nm टॉर्क आहे आणि ते ५-स्पीड मॅन्युअल किंवा ४-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. मारुती सुझुकीच्या मते, जिमनी मॅन्युअल १६.९४ kmpl चा मायलेज देते तर ऑटोमॅटिक व्हर्जन १६.३९ kmpl मायलेज देते. याशिवाय याच्यात फोर व्हिल ड्राइव्ह (4X4) ऑल प्रो सिस्टम देण्यात आली आहे. या SUV मध्ये कंपनीने आर्कमिजच्या प्रिमियम सराऊंड साऊंड सिस्टमचा वापर केला आहे. या SUV ला वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay आणि Arcams द्वारे साउंड सिस्टमसह ९-इंच टचस्क्रीन डिस्प्ले देखील मिळतो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki is offering a discount up to rs 2 5 lakh on the jimny pdb
Show comments