Maruti Suzuki Opts Cow Dung for Green Solutions: मारुती सुझुकी ही देशातील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. प्रवासी वाहनांचे उत्पादन करणारी ही कंपनी असून, आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स बाजारामध्ये लाँच करत असते. असे म्हटले जाते की गायींकडून मिळणारी प्रत्येक गोष्ट जसे की दूध, गोमूत्र आणि शेण हे उपयोगी आहेत. यामधील शेणाचा वापर आता हीच मारुती सुझुकी कंपनी ग्रीन सोल्युशनसाठी करणार आहे. तसेच या प्रकल्पातून २०३० पर्यंत कंपनीने ६ नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणायची तयारी सुरु केली आहे.

एका अहवालानुसार, भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीच्या सीएनजी वाहनांचा वाटा सुमारे ७० टक्के आहे. अशा परिस्थितीत मारुती सुझुकीचे सीएनजी मॉडेल बायोगॅसने चालवता आले, तर ती क्रांतीच ठरेल. यासाठी कंपनी नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. सुझुकी आगामी काळात आफ्रिका, आसियान आणि जपानसह अनेक देशांमध्ये बायोगॅस सुरू करून निर्यात करण्याचा विचार करत आहे.

Police Commissioner Amitesh Kumar has warned of action if high powered loudspeakers are used in ganesh immersion processions Pune new
विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेचे ध्वनीवर्धक वापरल्यास जप्त; ध्वनीवर्धक यंत्रणा पुरवठादार, ‘डीजें’ विरुद्ध कारवाईचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sensex, Mumbai stock market, Sensex fallen,
विश्लेषण : उच्चांकी पातळीवर पोहोचलेला मुंबई शेअर बाजार ‘सेन्सेक्स’ पुन्हा का  कोसळला? पडझड किती काळ सुरू राहणार?
Fifty three lakh telephone numbers closed by TRAI
पावणेतीन लाख दूरध्वनी क्रमांक ‘ट्राय’कडून बंद; त्रासदायक, अनावश्यक कॉल्सविरोधात मोहीम
fir against 25 including four companies in 35 crore fraud of 214 investors
२१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक; चार कंपन्यासह २५ जणांविरोधात गुन्हा
electric buses, electric buses ST fleet,
एसटीच्या ताफ्यात फक्त ६५ विद्युत बस, दर महिना २१५ बस ताफ्यात दाखल करण्याचा झाला होता करार
Upcoming Cars in September 2024
सप्टेंबरमध्ये मोठा धमाका! ग्राहकांनो, बाजारपेठेत दाखल होणार ‘या’ ५ नव्या कार; एकदा यादी पाहाच, टाटाचाही समावेश
2024 Hyundai Alcazar
ह्युंदाईने खेळला नवा गेम; बाजारपेठेत दाखल करण्यापूर्वीच ‘या’ ७ सीटर SUV ची बुकींग केली सुरु, किती मोजावे लागणार पैसे?

(हे ही वाचा : Ola ची ऑफर वाचली का? देशातली बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरवर देतेय बंपर सूट, होणार ‘इतक्या’ रुपयांची बचत)

कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतातील बायोगॅस केवळ कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावणार नाही तर आर्थिक विकासालाही चालना देईल. यासोबतच ग्रामीण भागातही मोठा हातभार लागणार आहे. कंपनीने सांगितले की, यासाठी सुझुकीने भारत सरकारच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि बनास डेअरीसोबत सामंजस्य करारही केला आहे. यासोबतच तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कंपनीने फुजिसन असागिरी बायोमास या जपानमधील शेणापासून बायोगॅस तयार करणाऱ्या कंपनीतही गुंतवणूक केली असून त्यांच्यासोबत मिळून तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू आहे.

कंपनी सतत इलेक्ट्रिक, फ्लेक्स इंधन आणि बायोगॅसच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे. वाढते प्रदूषण आणि महागडे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी कंपनीने बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. शेणापासून बायोगॅस तयार केला जातो, त्यामुळे आपल्या देशात त्याची निर्मिती करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. देशातील गावांमध्ये दुग्धजन्य कचऱ्याचे प्रमाण जास्त असून त्याच्या मदतीने बायोगॅस सहज तयार करता येतो.