Maruti Suzuki Jimny discount: या मार्च महिन्यात तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. यातच तुम्हीही मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते आहे. मारुती सुझुकी त्यांच्या जिमनीचा मागील वर्षीचा स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणूनच MY2023 जिमनीवर ती अजूनही १.५ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. २०२४ जिमनीची किंमत १२.७४ लाख ते १४.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
कंपनी २०२४ जिमनीवरही सूट देत आहे. Nexa डीलर्स MY2023 Jimny वर १.५ लाख रुपयांपर्यंत रोख सवलत देत आहेत, तर २०२४ मॉडेलवर ५० हजार रुपयांपर्यंत रोख सूट मिळत आहे. याशिवाय काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३००० रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.
जिमनी फक्त एक इंजिन पर्यायासह येते, जे १.५ लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन १०३bhp पॉवर आणि १३४.२Nm टॉर्क देते. या इंजिनसह ४-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ४-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय निवडला जाऊ शकतो.
मारुती सुझुकीच्या मते, मॅन्युअल ट्रान्समिशनसह जिमनी १६.९४ किमी/लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जिमनी १६.३९ किमी/लीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. ही SUV मानक म्हणून ४-व्हील-ड्राइव्ह प्रणालीसह येते. Zeta आणि Alpha या दोन प्रकारांमध्ये ही कार उपलब्ध आहे.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Hyundai ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV चा आणला नवा व्हेरिएंट, किंमत… )
जिमनी टॉप मॉडेलमध्ये अनेक चांगली वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. यात एलईडी हेडलॅम्प, फॉग लॅम्प, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, पुश स्टार्ट/स्टॉप इग्निशन आणि लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील आहे. SUV ला वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay आणि Arcams द्वारे साउंड सिस्टमसह ९-इंच टचस्क्रीन डिस्प्ले देखील मिळतो.
त्याच वेळी, Zeta ट्रिममध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay आणि मॅन्युअल क्लायमेट कंट्रोलसह ७-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. दोन्ही प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज, ABS आणि EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि रिअर पार्किंग कॅमेरा यांसारख्या इतर अनेक वैशिष्ट्यांसह देखील येतात.