मारुती सुझुकीच्या कार देशभरात खूप पसंत केल्या जातात. ग्राहक कार खरेदी करताना मारुतीच्या वाहनाना अधिक पसंत करताना दिसतात. नुकतीच मारुतीने भारतीय बाजारपेठेत आपली ऑफ-रोड एसयूव्ही लाँच केली होती. या एसयूव्हीला देशभरातून मोठी मागणी पाहायला मिळते. या पाच-दरवाज्यांची ऑफ-रोडर असलेल्या कारला इतकी डिमांड होती की, लाँच होण्याआधीच या कारला काही दिवसातच ३० हजारांहून जास्त बुकिंग मिळाली होती. या वर्षी मे महिन्यात १२.७४ लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच करण्यात आलेली ही कार आणखी स्वस्त झाली आहे. या कारच्या किमतीत कंपनीने कपात केली आहे.
Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी मारुतीने ही कार बाजारात सादर केली होती. मारुतीची ही कार Zeta आणि Alpha या दोन ट्रिममध्ये ऑफर केली आहे. यामध्ये मध्ये पाॅवर आणि मायलेज या दोन्ही गोष्टी मिळतात. याचे मायलेज १६.९४ किलोमीटर प्रति लिटर पर्यंत आहे. मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी जिमनीचे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे. ‘जिमनी थंडर एडिशन’ असे या नवीन मॉडेलचे नाव आहे. लोकांना जिमनीकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने आपले थंडर एडिशन लाँच केले आहे.
जिमनी थंडर एडिशनची किंमत जिमनी झेटापेक्षा दोन लाख रुपये कमी आहे. मारुती सुझुकी नेक्साच्या वेबसाइटनुसार, १२.७४ लाख रुपयांची जिमनी थंडर एडिशन १०.७४ लाख रुपयांना (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे. मर्यादित कालावधीसाठी ही सुरुवातीची किंमत ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. वर्षअखेर ग्राहकांना मारुति सुजुकी थंडर एडिशन जुन्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत दोन लाखांपर्यंत स्वस्त मिळणार आहे.
(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ २ सुरक्षित SUV समोर Brezza ना Creta सर्व पडल्या फिक्या? झाली धडाक्यात विक्री; खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा)
जिम्नी थंडर एडिशन १.५ लिटर चार सिलेंडर के१५८ हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले, जे १०५ एचपी आणि १३४ एनएम पॉवर जनरेट करते. जिमनी थंडर एडिशनच्या पॉवरट्रेन स्पेक्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. ट्रान्स्मिशनमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड टॉर्क कॉव्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय या इंजिनसह उपलब्ध असतील.
थंडर एडिशनमध्ये समाविष्ट मानक उपकरणांमध्ये फ्रंट स्किड प्लेट, साइड डोअर क्लेडिंग, डोअर व्हिझर, डोअर सिल गार्ड्स, ग्रिप कव्हर्स, फ्लोअर मॅट्स आणि रस्टिक टॅनमधील बाह्य ग्राफिक्स समाविष्ट आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा, ब्रेक असिस्ट फंक्शन आणि इंजिन इमोबिलायझर यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.