अनेक लोकांना ऑफ रोडींग ड्रायव्हिंग करण्याची आवड असते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑफ रोडींग करण्याचा आनंद लोकं घेत असतात. ऑफ रोडींगचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा काही गाड्या डोळ्यासमोर येतात. त्यामधील एक आहे म्हणजे मारूती जिप्सी. मारूती जिस्पीचा वापर हा रॅलीमध्ये तसेच पोलिसांनी आणि सैन्याने देखील केला. मात्र आता मारूती सुझुकीच या गाडीला टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.
मारुती सुझुकी जिप्सी आणि मारूती सुझुकी जिमनी या दोन वाहनांपैकी तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या दोन वाहनांची तुलना पाहणार आहोत. ज्यमुळे तुम्हाला कोणते वाहन खरेदी करायचे ते ठरवणे सोपे जाऊ शकते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
हेही वाचा : Renault चा मोठा रेकॉर्ड; भारतात ११ वर्षांमध्ये केली तब्बल ‘एवढ्या’ लाख गाड्यांची विक्रमी विक्री
परफॉर्मन्स
मारुती सुझुकीने जिप्सी या वाहनाला सुरुवातीच्या काळामध्ये १.० लिटर इंजिनसह लॉन्च केले होते. जे ४५ बीएचपीचे टॉर्क जनरेट करते. मात्र १९९६ मध्ये कंपनीने जिप्सीला मारूती इस्टिमच्या १.३ लिटर युनिटसह अपडेट केले. ज्यामुळे आता जिप्सीचे इंजिन ६० बीएचपीचे टॉर्क जनरेट करते. तथापि, आता यांच्या इंजिनची क्षमता ८० बीएचपी आहे. तर मारुती सुझुकी जिमनीमध्ये आधुनिक असे १.५ लिटरचे इंजिन देण्यात आले आहे. जे Brezza, Ciaz आणि Ertiga यांसारख्या गाड्यांमध्ये बघायला मिळते. जिमनीचे इंजिन हे ५-स्पीड मॅन्युअल किंवा ४-स्पीड ऑटोशी जोडलेले आहे. तर जिप्सीला ४-स्पीड मॅन्युअलसह विकले गेले होते. नंतर तिला ५-स्पीडमध्ये अपडेट करण्यात आले.
क्षमता
मारुती सुझुकी जिप्सी हे ऑफ-रोड वाहन होते. हे 4WD गिअरबॉक्ससह कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याला सामोरे जाऊ शकते. असेही म्हटले जाते की जेव्हा ऑफ-रोडिंगचा विचार केला जातो तेव्हा जिप्सीला दुसरा पर्याय नाही. मात्र, यामध्ये कोणताही डिफ लॉक दिसत नाही. तर दुसरीकडे, मारूती सुझुकी जिमनीमध्ये हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोलसह चांगल्या ट्रॅक्शनसाठी ब्रेक-अॅक्ट्युएटेड डिफ लॉक सारखी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मिळतात.
रोजच्या वापरासाठी या दोन्ही गाड्यांचा विचार केला असता जिमनी अधिक लक्झरी कार आहे. जिस्पीमध्ये असलेल्या लीफ स्प्रिंग सस्पेंशनमुळे रायडींग थोडे कठीण होते. ही हायवेवर ८० किमी प्रतितास या वेगाने धावू शकते. पण जिस्पी ही ऑन रोडच्या तुलनेत ऑफ रोडमध्येच चांगले प्रदर्शन करते. तर दुसरीकडे जिमनीमध्ये चांगले सस्पेंशन, इंजिन, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, एसी तसेच स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी आणि चांगली ब्रेक सिस्टीम बघायला मिळते. तसेच यामध्ये अनेक एअरबॅग्स, ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांसारखी सेफ्टी फीचर्स जिमनीला जिस्पीपेक्षा सुरक्षित बनवतात.