Maruti Suzuki Super Carry Mini Truck: दिग्गज फोर व्हीलर कंपनी मारुती सुझुकीने आज भारतीय बाजारपेठेत एक नवीन आणि अधिक शक्तिशाली मिनी ट्रक लाँच केला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE कडे फाइलिंग सादर करताना कंपनीने ही माहिती दिली. ‘Super Carry’ असे या मिनी ट्रकचे नाव आहे. कंपनीने ते पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि इंधन कार्यक्षमतेसह लाँच केले आहे. कंपनीने सांगितले की, हा मिनी ट्रक अशा लोकांसाठी बनवला आहे, ज्यांना चांगल्या दर्जाची आणि कामगिरीची व्ह्लयू आहे. कंपनीने या मिनी ट्रकमध्ये १.२ लीटर प्रगत के-सीरीज ड्युअल जेट आणि ड्युअल व्हीव्हीटी इंजिन दिले आहे.
‘Super Carry’ मिनी ट्रकमध्ये अपग्रेड केलेले इंजिन
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने या मिनी ट्रकमध्ये ४ सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ६००० rpm वर ५९.४ kW ची कमाल पॉवर आणि २९००rpm वर जास्तीत जास्त १०४.४ NM टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या मते, हा मिनी ट्रक त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम आहे.
(हे ही वाचा : पेट्रोलचा एक-एक पैसा करा वसूल! १ लिटरमध्ये धावेल ७५ किमी, किंमत फक्त ६२ हजार, खरेदीसाठी लागल्या रांगा )
पेट्रोल-सीएनजी या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध
कंपनीने सांगितले की, हा नवीन मिनी ट्रक आता पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, कंपनीने आज CNG कॅब चेसिसचा एक नवीन प्रकार देखील लाँच केला आहे. याशिवाय, इंजिन इमोबिलायझर सिस्टीमसह सुरक्षा वैशिष्ट्ये देखील सुधारली आहेत. हा मिनी ट्रक मारुती सुझुकीच्या २७० शहरांमध्ये पसरलेल्या ३७०+ कमर्शियल आउटलेट्समधून कुठूनही खरेदी केला जाऊ शकतो.
‘Super Carry’ मिनी ट्रक किंमत
दिल्लीच्या एक्स-शोरूमबद्दल बोलायचे झाल्यास, या मिनी ट्रकची सुरुवातीची किंमत ५.३० लाख रुपये आहे, जी ६.१५ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलेल्या प्रकारांमध्ये गॅसोलीन डेक, गॅसोलीन कॅब चेसिस प्रकार, सीएनजी डेक, सीएनजी कॅब चेसिस यांचा समावेश आहे.