मारुती सुझुकी आपली लोकप्रिय कार बलेनोचं फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नव्या बलोनो गाडीचा टीझर जारी केला आहे. नव्या मॉडेलमध्ये फ्रंट आणि एक्सटिरियर हायलाइट केलं आहे. कंपनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी नवी बलेनो गाडी लाँच करण्याची शक्यता आहे. तसेच अधिकृत नोंदणीही लवकरच सुरु होणार आहे. नव्या बलोनोत काही अपडेट्स असणार आहे. बलेनोच्या एक्सटिरियरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यात नविन एलॉय व्हील्स, रॅपराउंड टू पीस एलईडी टेल लाइट्स, हाय माउंटेड टॉप लॅम्पसह इंटीग्रेटेड स्पॉइलर, एक शार्क फिन एंटिना आणि रिफ्लेक्टरसह नवी डिझाइन असणार आहे. मागचा बम्पर जुन्या मॉडेलच्या तुलनेत उंच असणार आहे. त्याचबरोबर अपग्रेटेड ग्रिल असून क्रोम इंसर्ट असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२२ बलेनोच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात बरेच अपडेटेड केबिन फीचर्स असतील. नवीन फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, एक नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुन्हा डिझाइन केलेला डॅशबोर्ड, नवीन अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एव्ही व्हेंट लेआउट मिळेल.

2022 Audi Q7 फेसलिफ्ट एसयूव्ही भारतात लाँच, किंमत ८० लाखापासून सुरू

नवीन बलेनो १.२ लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे. पाच-स्पीड मॅन्युअल युनिट आणि सीव्हीटी युनिटशी जोडली जाईल. लाँच केल्यावर ही कार Hyundai i20, Tata Altroz, Toyota Glanza आणि Honda Jazz यांच्याशी स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki new baleno teaser leaked rmt