ऑटो मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत असतात. दर महिन्याला कोणती न कोणती ऑफर असतेच. आता मारुती सुझुकी कंपनीने मार्च महिन्यात काही निवडक मॉडेल्सवर सूट देण्याची घोषणा केली आहे. ही सूट ४१ हजार रुपयांपर्यंत असू शकते. यात रोख, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज ऑफर्सचा समावेश आहे. असं असलं तरी मारुती सुझुकीने सीएनजी मॉडेलवर कोणतीही सूट दिलेली नाही. सूट मिळालेल्या गाड्यांच्या यादीत वेगन आर गाडीचा समावेश आहे. पण अपडेटेड वर्जनवर नसून जुन्या मॉडेल्सवर आहेत. कंपनीने वॅगन आर १.२ लिटर व्हेरियंटवर ४१ हजार रुपयांपर्यंत सूट दिली आहे. तर १.० लिटर व्हेरियंट ही सूट ३१ हजार रुपयांपर्यंत असणार आहे.
मारूती सुझुकीच्या अल्टो गाडीवरही मोठी सूट देण्यात आली आहे. जुन्या ७९६ सीसी इंजिन आणि ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या अल्टो गाडीवर ही ऑफर असणार आहे. कंपनी पेट्रोल आणि सीएनजी प्रकारात हे मॉडेल आणलं होतं. या गाड्यांवर कंपनी ३१ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. तर एसटीडी व्हेरियंटवर ११ हजार रुपयांपर्यं सूट मिळू शकते. दुसरीकडे एस प्रेस्सोच्या मॅन्युअल व्हेरियंटवर ३१ हजारापर्यंत सूट मिळते. तर १६ हजारापर्यंत एएमटी व्हेरियंटवर सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर इको गाडीच्या ५ आणि ७ सीटर व्हेरियंटवर २९ हजारापर्यंत बचत करता येईल. तर स्विफ्ट मॅन्युअल व्हेरियंटवर २७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. तर याच मॉडेलच्या एएमटी मॉडेलवर १७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळवता येईल.
१ एप्रिल २०२२ पासून मोटार थर्ड पार्टी इन्शुरन्स महागणार!
डीझायर सब कॉम्पॅक्ट सेडान गाडीचाही सूट मिळणाऱ्या गाडीच्या यादीत समावेश आहे. मॅन्युअल व्हेरियंटवर २७ हजार, तर एमटी मॉडेलवर १७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. तर न्यू सेलेरिओ गाडीवर २६ हजारपर्यंत बचत करता येईल.येत्या महिन्यात मारुती सुझुकी कंपनी नवी ब्रेझ्झा गाडी लाँच करणार आहे. कंपनी विद्यमान मॉडेलवर २२ हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे