भारतीय बाजारपेठेत SUV कारची क्रेझ तर वाढत आहेच, पण त्याचबरोबर बाजारपेठेत सात सीटर कारचीही मागणी प्रचंड वाढली आहे. मोठ्या कुटुंबासाठी लोक सात सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. मार्केटमध्ये एक अशी सात सीटर कार आहे, त्या कारसाठी ग्राहकांची मागणी वाढली आहे. ही कार मायलेज अन् फीचर्समुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये अल्टोची ७,७९१ युनिट्सची विक्री झाली, तर या सात-सीटरची १३,५२८ युनिट्सची विक्री झाली होती. इतकेच नाही तर गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये या कारच्या विक्रीत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरून ही कार लोकांना किती आवडली आहे हे दिसून येते. या कारच्या वैशिष्ट्यांमुळेच ही कार खूप पसंत केली जाते. आपल्या कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी अनेक लोक ही कार खरेदी करतात. या कारची इतकी विक्री होत आहे की गेल्या महिन्यात मारुतीच्या सर्वात स्वस्त कार अल्टो K10 पेक्षा दुप्पट विक्री झाली आहे.
(हे ही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘या’ चार कार, मायलेज ४० किमी अन् किमतही कमी )
‘या’ कारला मोठी मागणी
मारुती सुझुकीने पुन्हा एकदा सात सीटर MPV सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व दाखवले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मारुती एर्टिगाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मारुती सुझुकी एर्टिगा हे भारतातील MPV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. Maruti Suzuki Ertiga मध्ये, तुम्हाला १.५-लीटर गॅसोलीन इंजिन पर्याय मिळतो, जो १०२bhp पॉवर आणि १३७Nm टॉर्क प्रदान करतो. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटशी जोडले जाऊ शकते. CNG इंजिनसह ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ८७bhp पॉवर आणि १२१.५Nm टॉर्क उपलब्ध आहे.
या कारची किंमत ८.६४ पासून सुरू होते. तर आॅन रोड १३.८ लाखांपर्यंत जाते. मारुती एर्टिगा ही 3-स्टार सेफ्टी रेटिंग असलेली कार आहे. या कारचे पेट्रोल मॉडल २०.५१ kmpl चे मायलेज देते तर सीएनजीसह ही कार २६.१ किमी प्रति किलो इतकं मायलेज देते.