देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली एस-प्रेसो (S-Presso) सीएनजी बाजारात नव्या अवतारामध्ये सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही नवीन एस-सीएनजी कार एक किलो सीएनजीमध्ये ३२.७३ किमी मायलेज देते.
इंजिन
ही नवीन सीएनजी कार १.०-एल नेक्स्ट जनरेशन ड्युअल जेट आणि ड्युअल VVT इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन ५,३०० आरपीएमवर ५६.६९ PS पॉवर आणि सीएनजी मोडमध्ये असताना ३४०० आरपीएमवर ८२.१ एनएम मॅक्झिमम डार्क जनरेट करू शकते. एस-प्रेसोची सीएनजी आवृत्ती ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आली आहे.
एस-प्रेसो च्या सीएनजी आवृत्तीला त्याच्या अतुलनीय इंधन कार्यक्षमता आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. सध्या, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये १० एस-प्रेसो सीएनजी मॉडेल्स आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या नवीन कारच्या डिझाईनमध्ये खर्च आणि पर्यावरण दोन्हीची काळजी घेण्यात आली आहे.
आणखी वाचा : डूकाटी ने भारतीय बाजारात लॉन्च केली ‘ही’ दमदार दुचाकी; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…
किंमत
कंपनीच्या या नवीन एस सीएनजी मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ५.९० लाख रुपये आहे.
दिवाळी स्पेशल ऑफर
एस-प्रेसोच्या या व्हेरियंटवर ३५,००० रुपयांपर्यंत रोक डिस्काउंट आहे तर, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे.