भारतातातील वाहन उत्पादन कंपन्यांपैकी एक कंपनी असलेली मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात एक नवीन गाडी घेऊन येत आहे. त्या गाडीचे नाव S-Presso ‘Xtra’ असे आहे. S-Presso ‘Xtra” हे मॉडेल अपडेटेड असणार आहे. कंपनीने यामध्ये अनेक फीचर्स अपडेट केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मारुती सुझुकी कंपनीने अधिकृतरीत्या सोशलमिडीया प्लॅटफॉर्मवरून S-Presso ‘Xtra’ ची घोषणा केली आहे. S-Presso ‘Xtra’ असे नाव असलेले हे मॉडेल hatchback च्या top-spec model वर आधारित असणार आहे. लवकरच Maruti Suzuki S-Presso ‘Xtra’ ची किंमत जाहीर होणार आहे.

हेही वाचा : २०२३ मध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार स्कोडाची ‘ही’ गाडी; जाणून घ्या भन्नाट फिचर्स

S-Presso ‘Xtra’ चे अपडेटेड फीचर्स

S-Presso हे मॉडेल आकर्षक दिसण्यासाठी अनेक accessories देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, front skid plate(फ्रंट स्किड प्लेट), door cladding (डोअर क्लॅडिंग )and wheel arch cladding (व्हील आर्च क्लेडिंग) असे फीचर्स देण्यात आले आहेत. S-Presso ‘Xtra’ मॉडेलला नवीन सीट आणि mats(मॅट्स) सोबत door panels (डोअर पॅनल्स) येतात.

जाणून घेऊयात इंजिन आणि गिअरबॉक्सविषयी

S-Presso Xtra k सिरीजमध्ये 1.0-litre dual-jet(1.0-लिटर ड्युअल-जेट), dual-VVT engine (ड्युअल-VVT इंजिन) असून स्टार्ट आणि स्टॉप असे नवीन तंत्रज्ञान यात असेल. ही मोटर ६५.७ bhp आणि ८९ Nm peak torque देते. या मॉडेलला ५ गिअरचा मॅन्युअल गिअरबॉक्स असून ते AMT (AGS) ला जोडलेले आहे.

कंपनीने अद्याप S Presso ‘Xtra’ लिमिटेड एडिशनच्या किंमतींचा खुलासा केलेला नाही. परंतु प्राप्त माहितीनुसार सर्वसाधारणपणे S-Presso ची सध्या एक्स-शोरूम किंमत ४.२५ लाख ते ६.१० लाख रुपये असू शकते. जी Renault Kwid, Maruti Suzuki Alto K10, Tata Tiago या गाड्यांशी स्पर्धा करेल.