Car Sales in June 2023: जून महिन्यातील कार विक्रीचे आकडे समोर आले आहेत. यावेळीही मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी बनली आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत जून २०२३ मध्ये वार्षिक २ टक्के वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत मारुतीनंतर ह्युंदाई दुसऱ्या तर टाटा मोटर्स तिसऱ्या स्थानावर आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ची घाऊक विक्री जूनमध्ये वार्षिक दोन टक्क्यांनी वाढून १,५९,४१८ युनिट्सवर गेली आहे. कंपनीने शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली.

कंपनीने जून २०२२ मध्ये १,५५,८५७ युनिट्सची घाऊक विक्री केली होती. कंपनीने सांगितले की, गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री आठ टक्क्यांनी वाढून १,३३,०२७ युनिट झाली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात १,२२,६८५ युनिट्स होती. अल्टो आणि एस-प्रेसो सारख्या छोट्या कारची विक्री गेल्या वर्षीच्या जूनमध्ये १४,४४२ युनिट्सवरून १४,०५४ युनिट्सवर कमी झाली. त्याचप्रमाणे, स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर यांचा समावेश असलेल्या कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील विक्री जून २०२२ मध्ये ७७,७४६ युनिट्सवरून १७ टक्क्यांनी घसरून ६४,४७१ युनिट्सवर आली आहे.

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

(हे ही वाचा : ५.७ लाखाच्या ‘या’ विदेशी कारसमोर सर्व पडल्या फेल, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा, इतर कंपन्या पाहतच राहिल्या)

मध्यम आकाराच्या सेडान सियाझची विक्री गेल्या वर्षी जूनमध्ये १,५०७ युनिट्सवरून वाढून १,७४४ युनिट्सवर पोहोचली. ब्रेझा, ग्रँड विटारा आणि एर्टिगा सारख्या युटिलिटी वाहनांची विक्री जून २०२२ मध्ये १८,८६० युनिट्सवरून जून २०२३ मध्ये ४३,४०४ युनिट्सपर्यंत वाढेल. कंपनीने सांगितले की, जूनमध्ये त्यांची निर्यात घटून १९,७७० युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत २३,८३३ युनिट्स होती.

टाटा आणि ह्युंदाईची विक्री

टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री (इलेक्ट्रॉनिक वाहनांसह) पाच टक्क्यांच्या वाढीसह ४७,२३५ युनिट्स झाली आहे. ह्युंदाईने सांगितले की, “देशांतर्गत विक्री मे २०२२ मध्ये ४९,००१ युनिट्सच्या तुलनेत मे महिन्यात ५०,००१ युनिट्सवर वर्षभरात दोन टक्क्यांनी वाढली.”

Story img Loader