Best Selling Cars In India: जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या अनेक गाड्यांचे आकडे जुलैमध्ये अचानक कोसळले. अनेक टॉप सेलिंग कार ग्राहकांनी खालच्या स्तरावर आणल्या आहेत. यामध्ये मारुती आणि टाटाच्या काही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा समावेश आहे.

जूनमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली वॅगनआर कमी विक्रीमुळे जुलैमध्ये आठव्या क्रमांकावर घसरली. त्याच वेळी, टाटा नेक्सॉन, जी सर्वात जास्त विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही होती, ती गेल्या महिन्यात नवव्या स्थानावर गेली. गेल्या महिन्यात, ग्राहकांनी स्विफ्टवर खूप प्रेम केले, ज्यामुळे ती जुलैची नंबर-१ कार बनली. स्विफ्टने गेल्या महिन्यात एकूण १७,८९६ मोटारींची विक्री केली

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
17 patients admitted to Nagpur hospitals after citizens flew kites with dangerous manja
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

त्याच वेळी, बलेनो क्रमांक-२ आणि मारुती ब्रेझा क्रमांक-३ वर राहिले, ज्यांनी अनुक्रमे १६,७२५ आणि १६,५४३ युनिट्सची विक्री केली. गेल्या महिन्यात, ७-सीटर एमपीव्ही एर्टिगा १४,३५२ युनिट्ससह चौथ्या क्रमांकावर होती, तर क्रेटा १४,०६२ युनिट्ससह पाचव्या क्रमांकावर होती.

(हे ही वाचा : Hero-Honda चे दणाणले धाबे, TVS ने ‘या’ टेक्नोलाॅजीसह नव्या अवतारात दाखल केला, देशात सर्वाधिक विकणारा स्कूटर )

मारुतीच्या कॉम्पॅक्ट सेडान डिझायरचीही चांगली विक्री झाली आणि ती १३,३९५ युनिट्ससह सहाव्या क्रमांकावर गेली. त्याचबरोबर मारुती फ्रँक्सच्या विक्रीतही जबरदस्त उडी नोंदवण्यात आली आहे. जूनमध्ये ही कार टॉप-१० यादीतून बाहेर होती परंतु जुलैमध्ये १३,२२० युनिट्सच्या विक्रीसह ती सातव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली.

Nexon प्रमाणे, मारुती सुझुकी WagonR देखील जून २०२३ मध्ये पहिल्या स्थानावरून लक्षणीयरीत्या घसरली (१७,४८१ युनिट्स). सुमारे २६ टक्के घसरणीसह, जुलैमध्ये केवळ १२,९७० युनिट्सची विक्री झाली. नेक्सॉन जूनमधील पाचव्या स्थानावरून जुलैमध्ये नवव्या स्थानावर घसरली आहे. एकूण १२,३४९ युनिट्ससह, नेक्सॉनच्या विक्रीचा आकडा जूनमधील १३,८२७ युनिट्सवरून घसरला आहे, जे सुमारे १०.५ टक्क्यांनी घसरले आहे.

वर्ष-दर-वर्ष आधारावर, Eeco ची विक्री जुलै २०२२ मध्ये १३,०४८ युनिट्सवरून २०२३ मध्ये १२,०३७ युनिट्सपर्यंत ८ टक्क्यांनी घसरण्याची अपेक्षा आहे. तथापि, महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर, जूनमध्ये ९,३५४ युनिट्सवर २५.८ टक्क्यांनी आश्चर्यकारक वाढ झाली आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट किंमत

मारुती सुझुकी स्विफ्टच्या १.२L MT प्रकारच्या कारचं मायलेज २२.३८kmpl आहे. तर दुसरीकडे १.२L AMT प्रकारच्या कारचं मायलेज २२.५६kmpl पर्यंत आहे. तर, स्विफ्ट CNG मॅन्युअलचे मायलेज ३०.९०km/kg इतके असणार आहे. मारुती सुझुकी स्विफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम, किंमत ५.९९ लाख रुपये आहे आणि कारमध्ये असणाऱ्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत ९.०३ लाख रुपये इतकी असणार आहे.

Story img Loader