Gncap crash test : अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात काही कारचा चक्क चुराडा झाल्याचेही तुम्ही वाचलेच असले. या पार्श्वभूमीवर कार घेताना सुरक्षा आणि मजबुती या गोष्टी तपासणे देखील गरजेच्या झाल्या आहेत. तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर Global NCAP चा अहवाल तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ग्लोबल एनसीएपी हे क्रॅश टेस्टिंग घडवून कार किती सुरक्षित आहे हे तपासते. अलीकडे ग्लोबल एनसीएपीने मारुतीच्या तीन हॅचबॅक्सची क्रॅश टेस्ट घेतली. यात सुरक्षेच्या बाबतीत ही वाहने खुपच कमी दर्जाची असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीएनसीएपीच्या अहवालनुसार, स्विफ्ट, एस प्रेस्सो आणि इग्निस या मारुती सुझुकीच्या ( Maruti suzuki car gncap crash test ) तीन वाहनांना केवळ १ स्टार रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे, केवळ स्विफ्टलाच प्रौढ आणि बाल सरंक्षण या दोन्ही श्रेणींमध्ये वन स्टार रेटिंग मिळाले आहे. तर एस प्रेस्सो आणि इग्निस चांगली कामगिरी करू शकले नाहीत. बाल संरक्षण चाचण्यांमध्ये त्यांना शुन्य स्टार मिळाले.

(BMW ने लाँच केली आजवरची सर्वात प्रगत SUV! २ कोटी ६० लाखाच्या गाडीचा पहिला लुक पाहून व्हाल थक्क)

‘GNCAP’ने 2020 मध्ये सिंगल एअरबॅग S Presso ची चाचणी केल्यानंतर पहिल्यांदाच भारतात बनवलेल्या आणि विकल्या जाणाऱ्या वाहनाला 1 स्टार रेटिंग दिले आहे. मारुतीचे कोणतेही मॉडेल मानक किंवा पर्यायी उपकरणे म्हणून ईएससी किंवा साइड कर्टन एअरबॅग प्रदान करत नाहीत. अशा प्रकारे फ्रंटल क्रॅश चाचणीदरम्यान तिन्ही वाहनांना मोठे नुकसान झाले.

Maruti suzuki swift कारने चालकाच्या आणि प्रवाशाच्या डोक्याला आणि मानेला चांगली सुरक्षा देण्यासह समाधानकारक फ्रंटल इम्पॅक्ट दाखवला. मात्र चालकाच्या छातीला कमकुवत सुरक्षा आणि प्रवाशाच्या छातीला समाधानकारक सुरक्षा मिळाल्याचे दिसून आले. चालकाचे गुडघे आणि प्रवाशाच्या उजव्या गुडघ्याला किरकोळ संरक्षण मिळते. कारच्या पुढल्या भागाच्या मागच्या धोकादायक संरचनांमुळे त्यांना इजा होऊ शकते.

(देशात लवकरच नवी टोल सिस्टीम? कॅमेरांमुळे वाचणार प्रवासाचा वेळ; जाणून घ्या सविस्तर)

Maruti ignis कारबाबत बोलायचे झाल्यास कारने चालक आणि प्रवाशाच्या डोक्याला आणि मानेला फाइन फ्रंटल इम्पॅक्ट केला. चालकाच्या छातीला कमजोर सुरक्षा आणि प्रवाशाच्या छातीला पुरेसे संरक्षण मिळाल्याचे आढळले. चालक आणि प्रवाशाच्या गुडघ्यांना किरकोळ संरक्षण दिसून आले.
एस प्रेस्सोने चालक आणि प्रवाशाच्या डोक्यावर आणि मानेवर चांगलाच फ्रंटल इम्पॅक्ट दिला. चालकाच्या छातीला खराब संरक्षण मिळाल्याचे दिसले ज्यामुळे १ स्टार रेटिंग मिळाले आणि प्रवाशाच्या छातील किरकोळ संरक्षण मिळाल्याचे दिसले. चालकाच्या गुडघ्यांना किरकोळ संरक्षण मिळते.

महिंद्राचीही रेटींग जारी

GNCAP चाचणीत प्रौढ सुरक्षेसाठी महिंद्राच्या स्कॉर्पिओ एनला ५ स्टार तर मुलांच्या सुरक्षेसाठी ३ स्टार रेटिंग मिळाले. तर, एक्सयूव्ही ३०० ला प्रौढ सुरक्षेसाठी ५ स्टार रेटिंग आणि मुलांच्या सुरक्षेसाठी ४ स्टार रेटिंग मिळाल्याचे ‘GNCAP’ने मंगळवारी सांगितले.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki swift ignis s presso got 1 star rating in gncap crash test ssb
Show comments