Auto Expo 2023: जानेवारी महिन्यात Auto Expo २०२३ इव्हेंट पार पडणार आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील सर्वात मोठ्या इव्हेंटपैकी हा एक आहे. या इव्हेंटमध्ये ऑटोमोबाइल कंपनी Maruti Suzuki आपल्या नवीन कारला सादर करणार आहे. कंपनी २०२३ च्या सुरुवातीला दोन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी मारुती Baleno Cross YTB आणि Jimny 5-door या गाड्या लाँच करणार आहे. तसेच एक इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. या गाड्या २०२३ च्या दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये सादर केल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काय असेल या दोन SUV कारमध्ये खास, चला तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maruti Suzuki 5-Door Jimny

मारुती सुझुकी भारतात जिम्नी कारचं ५ डोर व्हर्जन लाँच करणार आहे. ही कार अनेकवेळा टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. अलीकडेच टेस्टिंग दरम्यान ही कार लेहमध्ये ग्रँड विटारा आणि महिंद्रा थारसह दिसली. मारुतीची ही अपडेटेड कार लॉन्च झाल्यानंतर भारतात याची स्पर्धा महिंद्रा थारशी होणार आहे. नवीन जिम्नीमध्ये (Maruti Suzuki Jimny) कंपनीने पॅडल शिफ्टर्ससह नवीन १.५ L पेट्रोल इंजिन दिले आहे.

(हे ही वाचा : काय आहे असे की, ‘ही’ कार विक्रीत ठरली नंबर वन; कार खरेदीसाठी ग्राहकांच्या लागल्या रांग )

यात ग्राहकांना ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. हे एक माईल्ड हायब्रिड इंजिन असेल, जे फुल हायब्रीडसह ग्रँड विटारामध्ये आधीच देण्यात आले आहे. नवीन जिम्नीमध्ये कंपनीने ३६०-डिग्री कॅमेरा, हेड्स-अप डिस्प्ले, ऑफ-रोड स्पेशल डिस्प्ले आणि  टचस्क्रीनसह ३-डोअर ग्लोबल मॉडेलपेक्षा खूप चांगले फीचर्स दिले आहेत. 

(हे ही वाचा : Auto Expo 2023: इव्हेंट, कुठे आणि केव्हा होईल? तुम्हाला प्रवेश कसा मिळेल? कोणत्या कंपन्या करणार वाहने लाँच? जाणून घ्या सविस्तर)

Maruti Baleno YTB Cross

मारुती सुझुकी कंपनी एका नवीन एसयूव्हीवर काम करत आहे. या कारचं टेस्टिंग देखील सुरू झालं आहे. या कारला बलेनो क्रॉस असं नाव दिलं जाऊ शकतं. ही क्रॉसओव्हर कार पुढच्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये डेब्यू करणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यात ही कार भारतात अधिकृतपणे सादर केली जाईल.

(हे ही वाचा : मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय, ‘या’ तीन आहेत देशातील सर्वात स्वस्त कार!)

नवीन बलेनो क्रॉसमध्ये स्लोपिंग रूफलाईन आणि मोठा ग्राऊंड क्लीअरन्स मिळेल. या कारचं फ्रंट ग्रिल सध्याच्या बलेनोपेक्षा थोडं मोठं आणि रुंद असेल. यात १६ इंचांचे अलॉय व्हील्स मिळतील. बलेनो क्रॉस कारमध्ये रेक्ड व्हींडशील्ड, चन्की बम्पर आणि बूट लिड इंटीग्रेटेड स्पॉयलर मिळेल.

(Auto Expo 2023: लवकरच बदलणार तुमची कार चालवण्याची पद्धत ‘ही’ कंपनी देशात सादर तंत्रज्ञानाने सुसज्ज कार)

Maruti’s Electric SUV & Flex-Fuel Model

कंपनी ऑटो एक्सपोमध्ये YY8 या कोडनेमने इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्हीला सादर करणार आहे. कंपनी २०२५ मध्ये या गाडीला लाँच करेल. गाडीची रेंज ५०० किमी असू शकते. जवळपास १३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणारी ही कार कंपनीची भारतातील पहिले इलेक्ट्रिक मॉडेल असेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki to debut 2 suvs maruti suzuki 5 door jimny and maruti baleno ytb cross at indian auto expo 2023 pdb
Show comments