Upcoming CNG cars in India: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे देशातील बाजारपेठेत सीएनजी वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. सामान्यत: ग्राहक कार विकत घेताना आपल्या सुरक्षेचा विचार तर करतातच, पण, कमी पैशांत जास्तीत जास्त सेफ्टी फीचर्स आणि जास्त मायलेज ग्राहकांना हवे असतात. अशातच सीएनजी कारलाही लोकांची मागणी आहे. बाजारपेठेत सध्या सीएनजी कारचे वर्चस्व कायम आहे. हे पाहता अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या कारचे मॉडेल सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रँड मारुती सुझुकी सुध्दा नवं खेळ खेळण्याच्या तयारीत आहे.

मारुती सुझुकीच्या तीन सीएनजी कार

आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी लवकरच आपल्या तीन कार सीएनजी आवृत्तीमध्ये देशातील बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, त्यापैकी दोन कार एसयूव्ही असतील, अशी माहिती आहे. वास्तविक, मारुती सुझुकी CNG मध्ये ब्रेझा आणि फ्रॉन्क्स SUV सोबत नवीन Swift लाँच करण्याचा विचार करत आहे.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
enlist traffic police to stop car racing on coast road
सागरी किनारा मार्गावरील भरधाव गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेणार
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

मारुती ब्रेझा सीएनजी आणि फ्रॉन्क्स सीएनजीचा टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या गाड्या छोट्या क्लिपमध्ये पाहता येतील. त्यामध्ये एक CNG स्टिकर देखील दिसू शकतो, जो पुष्टी करतो की दोन्ही कार फॅक्टरी फिट सीएनजी किटसह येतील आणि लवकरच लॉन्च केल्या जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

(हे ही वाचा: बाजारपेठेत उडाली खळबळ! बजाजचा नवा गेम; Pulsar आता नव्या अवतारात ४ रंगात देशात दाखल, किंमत…)

अहवालांवर विश्वास ठेवला तर, Brezza आणि फ्रॉन्क्सचे CNG मॉडेल स्वयंचलित ट्रांसमिशनसह येऊ शकतात. याशिवाय या कार ट्विन-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानासह देखील येऊ शकतात. त्यामुळे गाड्यांची बूट स्पेसही चांगली राहील. सध्या हे तंत्रज्ञान भारतात फक्त टाटा मोटर्स वापरत आहे.

ट्विन-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान काय आहे?

सीएनजी कारच्या बाबतीत अनेकदा त्रासदायक ठरणारी गोष्ट म्हणजे बूट स्पेसची कमतरता. सीएनजी प्रकारातील वाहनांमध्ये टाकीमुळे बूट स्पेस शिल्लक राहत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी टाटा मोटर्सने ड्युअल टँक सेटअप वापरण्यास सुरुवात केली. या सेटअपला iCNG तंत्रज्ञान म्हणतात. हे टाटा अल्ट्रोझ, टिगोर, टियागो आणि पंचच्या सीएनजी मॉडेल्समध्ये पाहिले जाऊ शकते. ड्युअल सीएनजी तंत्रज्ञानामध्ये एका मोठ्या इंधन टाकीऐवजी दोन लहान टाक्या दिल्या जातात. यामुळे बूट स्पेसची बरीच बचत होते.

आता मारुती सुझुकीही याच तंत्रज्ञानाचा अवलंब करणार असल्याचे बोलले जात आहे. मारुती स्विफ्ट सीएनजी, फ्रॉन्क्स सीएनजी आणि ब्रेझा सीएनजीमध्ये ट्विन सिलेंडर तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते, अशीही माहिती आहे.

Story img Loader