मारूती सुझुकी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. मारूती सुझुकी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. ज्यात अनेक फीचर्स आणि अपडेट्स कंपनी ग्राहकांना ऑफर करते. एक वर्षभरापूर्वी मारूतीने आपले ग्रँड विटारा (Grand Vitara ) हे मॉडेल लॉन्च केले होते. या मॉडेलने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे.मारूती सुझुकी ग्रँड विटारा लॉन्च झाल्यापासून एक वर्षांमध्ये एक लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे. १ लाख विक्रीचा टप्पा गाठणारी पहिली मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. आतापर्यंत कंपनीने १.२ लाख युनिट्सची विक्री केली आहे.

कार निर्मात्याने एका वर्षात १ लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली आहे. तसेच २४ टक्के मार्केट शेअरसह भारतातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. १० ते २० लाख रुपयांच्या किंमतीमधील सेगमेंटमध्ये ग्रँड विटारा मॉडेल आघाडीवर आहे. मारूतीने सुझुकीने ग्रँड विटारा मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केली होती. ग्रँड विटारा हे ह्युंदाई क्रेटाचे वर्चस्व असलेल्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमधील कंपनीचे पहिले मॉडेल होते. सध्या ग्रँड विटाराची एक्स शोरूम किंमत ही १०. ७ लाख रुपये इतकी आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत

हेही वाचा : VIDEO: बीएमडब्ल्यूने भारतात लॉन्च केली ‘ही’ इलेक्ट्रिक एसयूव्ही; एका चार्जमध्ये धावणार ४४० किमी, किंमत…

ग्रँड विटारामध्ये नॅचरली एस्पिरेटेड असे १.५ लिटरचे १०३ बीएचपी पॉवर निर्माण करणारे शक्तिशाली असे हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. मारुती सुझुकीने या हायब्रीड टेक्नॉलॉजीला टोयोटासह शेअर केले आहे. सध्या कंपनी ग्रँड विटारा हायब्रीड आणि मारुती सुझुकी इनव्हिक्टो हायब्रिड ऑफर करते. मारुतीने हायब्रीड टेक्नॉलॉजी अधिक परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये सादर करण्याची शक्यता नाकारलेली नाही आहे. परंतु कंपनी सध्या या टेक्नॉलॉजीला किती मागणी आहे व ग्राहकांचा मिळणार प्रतिसाद याचा अभ्यास करत आहे.

याशिवाय मारुती सुझुकीने ग्रँड विटारा हे मॉडेल ऑलग्रीप व्हेरिएंटसह या सेगमेंट मधील पहिले मॉडेल आहे. हा एक ऑल ड्राइव्ह पर्याय आहे. हा पर्याय मॅन्युअल गिअरबॉक्ससह नॅचरली एस्पिरेटेड माइल्ड हायब्रीड इंजिनच्या सपोर्टसह येते. मारुती सुझुकीने टोयोटा हायरायडरसह पॉवरट्रेन पण शेअर केले आहे. कारण ग्रँड विटारा हे मारुती सुझकी आणि टोयोटाच्या भागीदारीत तयार केलेले मॉडेल आहे.

Story img Loader