Best Selling Car: सध्या मारुती सुझुकीच्या परवडणाऱ्या SUV कार आणि हॅचबॅक कारना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. २०२३ पासून सुमारे ७ महिने उलटून गेले आहेत आणि आता पहिल्या ६ महिन्यांतील वाहनांच्या विक्रीचे आकडे आले आहेत. या यादीत ५.५ लाख रुपये किमतीच्या लोकप्रिय हॅचबॅक कारने मारुती सुझुकी स्विफ्ट आणि मारुती बलेनोसह इतर सर्व वाहनांना मागे टाकून प्रथम क्रमांक मिळवला. ६ महिन्यांत या वाहनाची १ लाखाहून अधिक युनिट्स खरेदी करण्यात आली आहेत.
२०२३ च्या पहिल्या सहामाहीत हॅचबॅक आणि SUV कारनं ग्राहकांच्या मनावर राज्य केले. मारुती WagonR ने २०२३ च्या पहिल्या सहामाहीत भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रवासी वाहनांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. त्याची एकूण १,०९,२७८ युनिट्सची विक्री झाली आहे. तर २०२२ च्या पहिल्या सहामाहीत १,१३,४०७ युनिट्सची विक्री झाली. अशा प्रकारे वॅगनआरच्या विक्रीत ६.५९ टक्क्यांनी घट झाली आहे.
(हे ही वाचा : महिंद्राच्या ‘या’ स्वस्त सात सीटर कारसमोर Ertiga-Innova चा झाला गेम, झाली धडाधड विक्री, खरेदीसाठी तर… )
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारी मारुती स्विफ्ट कार होती. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत त्याची विक्री १४.५७ टक्क्यांनी वाढून १,०४,४६५ युनिट्स झाली. यानंतर, बलेनोची विक्री ३७.३४ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह १,००,१०७ युनिट्सपर्यंत वाढली. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत या तीन हॅचबॅकने एक लाखापेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली.
Tata Nexon २०२३ ची विक्री पहिल्या सहामाहीत ८७,५०१ युनिट्सवर पोहोचली आहे जी मागील वर्षी याच कालावधीत ८२,७७० युनिट्सची विक्री झाली होती. २०२३ च्या पहिल्या सहामाहीत Hyundai Creta ची विक्री २२.४६ टक्के वार्षिक वाढीसह ८२,५६६ युनिट्स झाली. या यादीत क्रेटा पाचव्या क्रमांकावर होती. त्यापाठोपाठ मारुती ब्रेझा (८२,१८५ युनिट), अल्टो (८०,९०३ युनिट्स) आणि डिझायर (७२,२७८ युनिट्स) यांचा क्रमांक लागतो. Eeco (६७,७३२ युनिट्स) यादीत नवव्या क्रमांकावर आहे आणि टाटा पंच (६७,११७ युनिट्स) दहाव्या स्थानावर आहे.