Auto Expo 2023 : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गेल्या काही काळापासून इथेनॉलचे उत्पादन आणि त्याच्या वापरासाठी आग्रही आहेत. इथेनॉल स्वस्त असून त्यामुळे शेतकरी आणि वाहन चालविणाऱ्यांना देखील लाभ होईल. तसेच इतर इंधनाच्या तुलनेत प्रदूषणही कमी होते, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर आता भारतीय मध्यमवर्गीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मारुतीने फ्लेक्स इंधनावर चालणारी Wagon-R लाँच केली आहे. जी ८० टक्के इथेनॉल मिश्रीत इंधनावर चालू शकेल. दिल्ली येथे चाललेल्या ‘द मोटर शो’ या १६ व्या ऑटो एक्सपो मध्ये ४० हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून अनेक कंपन्यांनी एकापेक्षा एक नवे मॉडेल्स लाँच केले आहेत.
मोठा गाजावाजा करत दिल्लीमध्ये Auto Expo 2023 ची सुरुवात झाली आहे. या इव्हेंटच्या आदल्या दिवशीच मारुती सुझुकी या कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV (Maruti eVX) लाँच केली आहे. आकर्षक डिझाईन लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी असलेली ही जबरदस्त कार लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
आणखी वाचा – Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स
कसं आहे Wagon-R नवं मॉडेल
मारुती सुझुकीने लाँच केलेले हे नवे मॉडेल E85 इंधनावर चालणार आहे. अशा प्रकारच्या गाड्या या २० ते ८५ टक्के इथेनॉल ब्लेडिंगवर चालू शकतील अशाप्रकारे विकसित करण्यात आल्या आहेत. मायलेजच्याबाबतीत बोलायचे झाल्यास या गाड्या स्वस्त आहेत. कारण सध्या इथेनॉल हे पेट्रोल-डिझेल दराच्या तुलनेत स्वस्त दरात मिळत आहे. या गाड्यांची विशेष बाब म्हणजे या गाड्या पेट्रोल-डिझेलसारखाच चांगला परफॉर्मन्स आणि उत्तम रनिंग कॉस्ट देतात.
आणखी वाचा – Auto Expo 2023: 6 एअरबॅग आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या Hyundai च्या ‘या’ फेसलिफ्टचे बुकिंग सुरु; किंमत…
फ्लेक्स फ्युअलमुळे प्रदूषण कमी होणार
इथेनॉल वापरुन वाहन चालविल्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत ७९ टक्क्यांपर्यत प्रदूषण घटण्याची शक्यता आहे. फ्लेक्स फ्युअल हे इथेनॉल आणि मिथेनॉल सारखे उच्च दहन क्षमता असलेल्या इंधनाला पेट्रोलमध्ये मिश्रण केल्यानंतर मिळते. ज्यामुळे प्रदूषण कमी होते आणि गाडीला चांगला मायलेजही मिळतो. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे सीईओ हिमाशी टेकुची यांनी दावा केला की २०२५ पर्यंत फ्लेक्स फ्युअलवर चालणारे वाहन बाजारात येतील.
आणखी वाचा – Auto Expo 2023: लक्झरी सेडान BMW i7 आणि BMW 7 सीरीज भारतात लाँच, बघताच पडाल प्रेमात; फक्त ‘एवढी’ असेल किंमत
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV देखील लाँच
याआधी या इव्हेंटमध्ये मारुतीने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच केली. ही सिंगल चार्जमध्ये ५५० किमी पर्यंत चालू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने या गाडीचे डिझाइन डेव्हलप केलेले आहे. या गाडीच्या निर्मितीसाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही मारुती सुझुकीतर्फे सांगण्यात आले आहे.