यंदाच्या दिवाळीत कुटुंबासाठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकदा कारचे बजेट जास्त असल्यामुळे बहुतांश लोकांना कार खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे कार खरदी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण आता चिंता करु नका, कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशी कार घेऊन आले आहोत, जी कार तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल. खरंतर भारतीय बाजारपेठेतील ही कार खूप लोकप्रिय कार आहे. २० वर्षांहून अधिक काळ देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये या कारचा समावेश आहे. ही कार तिच्या जबरदस्त फीचर्स अन् मायलेजमुळे बाजारपेठेत खूप पसंत केली जात आहे. ही कार फायनान्स प्लॅनद्वारे तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल.
देशातील ग्रामिणसह शहरातील रस्त्यांवर ही कार धावताना दिसते. या कारचा देखभाल खर्चही खूपच कमी आहे. या कारचे सीएनजी प्रकार खूप लोकप्रिय आहे. या कारमध्ये तुम्हाला दोन इंजिन पर्याय मिळतात. यामध्ये तुम्हाला १.० लीटर आणि १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने ही कार सीएनजी व्हेरियंटमध्येही दिली आहे. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, पेट्रोलवर २७ किमी प्रति लिटर आणि सीएनजीवर ३२ किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देते. कारच्या मेंटेनन्सबद्दल बोलायचे झाले तर वार्षिक मेंटेनन्स ६ हजार रुपये येतो. अशा स्थितीत मासिक खर्च म्हणून पाहिले तर तो ५०० रुपये येतो.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांना फुटला घाम, ‘या’ दिवशी देशात येतेय Royal Enfield ची नवी बुलेट, फीचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!)
आम्ही तुम्हाला देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुतीच्या वॅगन-आर कारबद्दल माहिती देत आहोत. वॅगन आर देशातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कारपैकी एक आहे. त्याचा बेस व्हेरिएंट तुम्हाला ५.५४ लाख रुपयांना उपलब्ध असेल. जर आपण त्याच्या टॉप वेरिएंटबद्दल बोललो तर ते ७.४२ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
देशातील जवळपास सर्व बँका आणि NBFC देखील कारवर फायनान्स सुविधा प्रदान करतात. तुम्ही ऑन रोड किमतीवर कारसाठी कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही त्याचे बेस मॉडेल घेतले तर तुम्हाला ऑन रोड ६ लाख ०९ हजार ९८४ रुपये खर्च येईल. या किमतीवर, तुम्ही ७ वर्षांसाठी ९ टक्के व्याजदराने कार कर्ज घेतल्यास, तुमचा हप्ता दरमहा ९,८१४ रुपये होईल. व्याज अंतर्गत, तुम्हाला सात वर्षांत २ लाख १४ हजार ३९९ रुपये द्यावे लागतील.