Maruti Car Sales In March 2023:  भारतीय वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचं बाजारपेठेत वर्चस्व आहे. भारतीय बाजारात मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक पसंत केल्या जातात. मारुती सुझुकी वॅगनआर ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. ही अनेक वेगवेगळ्या महिन्यांत सर्वाधिक विक्री होणारी कार देखील आहे. मार्च महिन्यातही तिची चांगली विक्री झाली आहे, ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. परंतु, त्याची विक्री वार्षिक आधारावर तुलना केली तर ती कमी झाली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, मारुती सुझुकी वॅगनआरच्या विक्रीत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीने मार्च २०२३ मध्ये त्यातील केवळ १७,३०५ युनिट्सची विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत (म्हणजे मार्च २०२२), मारुती सुझुकीने WagonR च्या २४,६३४ युनिट्सची विक्री केली आहे.

Maruti Suzuki WagonR फीचर्स

मारुती WagonR च्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी आणि परवडणारी फॅमिली कार म्हणून तीच्याकडे पाहिलं जातं. ही ५-सीटर कार आहे. 12 पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स या कारमध्ये दिसतात. मारुती वॅगनआरमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, पॅसेंजर एअरबॅग, EBD सह ABS, बजरसह सीट बेल्ट रिमाइंडर, सीट बेल्ट प्री-टेन्शनर, स्पीड अलर्ट सिस्टम, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक, सिक्युरिटी अलार्म, रिअर पार्किंग सेन्सर, सेंटर डोअर लॉकिंग, चाइल्ड प्रूफ असे फीचर्स आहेत.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

(हे ही वाचा : किंमत कमी अन् परफाॅर्मन्सची हमी! ‘या’ चार सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईकसाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी )

Maruti Suzuki WagonR मायलेज

मारुती सुझुकीनं आपली लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआर अधिक चांगल्या लूक आणि फीचर्ससह बाजारात आणली होती. त्यानंतर या कारची क्रेझ इतकी वाढली. मारुती सुझुकी वॅगनआर ही कार पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनवर २३.३६ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. या कारचं एजीएस मॉडेल २४.४३ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. सीएनजीवर ही कार ३४.०५ किमी प्रति किलो इतकं मायलेज देते.

Maruti Suzuki WagonR  किंमत

या कारची सुरुवातीची दिल्लीतली एक्स शोरूम किंमत ५.५३ लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ७.२० लाख रुपये इतकी आहे. तर या कारच्या सीएनजी मॉडेलची किंमत ६.४२ लाख रुपये इतकी आहे.