Maruti Suzuki WagonR Waltz launched in India: देशातली सगळ्यात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांची प्रसिद्ध हॅचबॅक कार वॅगनारची नवीन लिमिटेड एडिशन वॉल्टज लॉन्च केली आहे. या नव्या कोऱ्या WagonR Waltz मध्ये काही अपडेट्स दिले गेले आहेत, जे या कारला बाकीच्या मॉडेल्सपेक्षा हटके बनवतात.

आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या फॅमिली कारची सुरुवातीची किंमत ५.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 

कंपनीने WagonR Waltz Edition तीन व्हेरियंट्समध्ये सादर केली आहे: LXi, VXi आणि ZXi.

हेही वाचा… घरच्या घरी करा बाईक सर्व्हिसिंग आणि वाचवा पैसे, दमदार परफॉरमन्ससह मिळेल भरपूर मायलेज

कारच्या अपडेट्समध्ये फॉग लॅम्प्स, व्हील आर्क क्लॅडिंग, बंपर प्रोटेक्टर्स, साइड स्कर्ट्स, बॉडी साइड मोल्डिंग, नवीन फ्लोअर मॅट्स, इंटीरियर स्टाइलिंग किट्स आणि फ्रंट क्रोम ग्रिल यांचा समावेश आहे. हे नवीन एलिमेंट्स कारला स्पोर्टी लूक देण्यास मदत करतात. याशिवाय WagonR Waltz मध्ये ६.२ इंच टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम, स्पीकर्स, सुरक्षा व्यवस्था आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

पॉवर आणि मायलेज

कंपनीने १.२ लिटर पेट्रोल आणि १.० लिटर पेट्रोल इंजिन पर्यायांसह WagonR Waltz एडिशन सादर केले आहे. इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्येदेखील उपलब्ध आहे. याशिवाय ही कार सीएनजी व्हेरियंटमध्येही सादर केली गेली आहे.

हेही वाचा… VIDEO: “देव कोणत्या रूपात…”, जिममध्ये अचानक एकावर पडला डंबेल अन्…, पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

कंपनीचा दावा आहे की, त्याचं पेट्रोल व्हेरिएंट २५.१९ किमी/लिटरचे मायलेज देते आणि CNG व्हेरिएंट ३३.४८ किमी/किलो मायलेज देते.

हेही वाचा… Triumph Speed ​​T4 झाली भारतात लॉंच; हाय-टेक फिचर्ससह देणार दमदार परफॉर्मन्स, किंमत फक्त…

सेफ्टी फीचर्स

WagonR Waltz मध्ये काही नवीन फीचर्स जोडण्यात आली आहेत. ही कार आता अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी कंट्रोल (ESC) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) ने सुसज्ज आहे. याशिवाय त्याचे इतर फीचर्स पूर्वीप्रमाणेच आहेत. यात ड्युअल एअरबॅग्ज, रेअर पार्किंग सेन्सर, स्पीड लिमिट अलर्ट इत्यादींचा समावेश आहे.

Story img Loader