Maruti Alto K10 vs Alto K10 based Tour H1: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मारुती सुझुकीने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. या कंपनीच्या अनेक प्रोडक्ट्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय ग्राहकांना खुश करण्यासाठी ही कंपनी नवनवीन कार्स लॉन्च करत असते. नुकतंच मारुती सुझुकी कंपनीने भारतामध्ये Alto K10 based Tour H1 ही कमर्शियल कार लॉन्च केली आहे. ही कार मारुतीच्या Maruti Alto K10 या मॉडेलवर आधारलेली आहे. पर्सनल आणि कमर्शियल सेगमेंटमधील Maruti Alto K10 आणि Alto K10 based Tour H1 या कार्समध्ये बऱ्याच गोष्टी समान आहे. त्यामुळे या दोन्ही चारचाकी वाहनांबाबत लोकांमध्ये Confusion आहे.

मारुती सुझुकीच्या या दोन गाड्यांची तुलना करुन त्यातील कोणती कार ग्राहकांसाठी बेस्ट आहे हे आम्ही सांगणार आहोत.

Kia India Launches New Carnival
New Kia Carnival ची एकच चर्चा! एवढ्या लाखात केली लाँच, जाणून घ्या, या कारचे भन्नाट फीचर्स
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Met Gala Sari 23-Foot did not let Alia Bhatt use the washroom for six hours
२३ फूट लांबीच्या साडीमुळे आलिया भट्ट सहा तास वॉशरुमला गेली नाही; जाणून घ्या, लघवी रोखणे किती धोकादायक आहे?
DRDO and ISRO News
DRDO and ISRO : ‘डीआरडीओ’ आणि ‘इस्रो’मध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या!
Risk of Heart Attack During Angiography
अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Google Trending Personal Loans in Marathi
Personal Loans : भारतात पर्सनल लोनच्या मागणीत प्रचंड वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज? वाचा सविस्तर
Loksatta anvyarth Bombay High Court decision regarding changes in the Information Technology Regulations of the Central Government
अन्वयार्थ: सत्यप्रियता म्हणजे सत्ताप्रियता नव्हे!
superbugs 4 million death till 2050
सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?

Maruti Alto K10 vs Alto K10 based Tour H1: किंमत

भारतात मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये Maruti Alto K10 लॉन्च करण्यात आली होती. या कारची किंमत ३.९९ ते ५.८३ लाख रुपये इतकी असल्याचे पाहायला मिळते. कंपनीने नोव्हेबर २०२२ मध्ये या गाडीचे CNG-Variant लॉन्च केले होते. ५.९४ लाख रुपये किंमतीसह हे व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले होते. व्हेरिएंट्सनुसार, मॉडेल्सच्या किंमतीसंबंधित माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हेरिएंटMTAGS
STD3.99 लाख रुपये
LXi4.82 लाख रुपये
VXi4.99 लाख रुपये5.49 लाख रुपये
VXi+5.33 लाख रुपये5.83 लाख रुपये
VXi S-CNG5.94 लाख रुपये
(सोर्स – Financial Express)

आणखी वाचा – टाटा मोटर्सची मोठी डिस्काउंट ऑफर! ‘या’ ४ महागड्या गाड्यांवर मिळणार भरघोस सूट

काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीने बाजारामध्ये Alto K10 वर आधारित Tour H1 ही गाडी लॉन्च केली. या कारचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ४.८० लाख रुपये तर, CNG MT व्हेरिएंटची किंमत ५.७० लाख रुपये इतकी आहे. Alto K10 based Tour H1 कारमध्ये Metallic Silky Silver, Metallic Granite Grey आणि Arctic White असे कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात.

Maruti Tour H1 व्हेरिएंटकिंमत
पेट्रोल MT4.80 लाख रुपये
बाय-फ्यूल CNG MT5.70 लाख रुपये
(सोर्स – Financial Express)

आणखी वाचा – मारूती सुझुकीने लॉन्च केली ‘ही’ नवीन Alto; ग्राहकांना सीएनजी आणि पेट्रोल व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येणार

Maruti Alto K10 vs Alto K10 based Tour H1: मायलेज

मॉडलसेगमेंटव्हर्जनमायलेज
Alto K10Private/ Personalपेट्रोल24.3 किमी प्रति लीटर
Alto K10Private/ PersonalS-CNG33.85 किमी प्रति किलो
Alto K10 Based Tour H1Commercialपेट्रोल24.60 किमी प्रति लीटर
Alto K10 Based Tour H1CommercialCNG34.46 किमी प्रति किलो
(सोर्स – Financial Express)

मायलेजच्या बाबतीमध्ये Alto K10 ही पुढे आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत या कारचे अनेक व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. Alto K10 पेट्रोल व्हेरिएंट एका लीटरमध्ये २४.३ किमी मायलेज देते. तसेच याचे S-CNG व्हेरिएंट एक किलो CNG मध्ये ३३.८५ किमीचा प्रवास करण्यास सक्षम आहे. दुसऱ्या बाजूला Alto K10 based Tour H1 ही कमर्शियल कार Ola, Uber सारख्या मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीमध्ये सर्व्हिस देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या दोन्ही कार्स मायलेजच्या बाबतीत काही प्रमाणात समान स्थितीमध्ये आहेत असे काहीजण म्हणत आहेत.