Maruti Suzuki’s price hikes : मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. दिवसेंदिवस मारुती सुझुकीच्या वाहनांची चांगलीच मागणी वाढत आहे. अशात सोमवारी मारुती सुझुकी कंपनीने एप्रिल महिन्यापासून वाहनांच्या किमती ४ टक्क्यांनी वाढवत असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने वाढता इनपुट खर्च आणि ऑपरेशनल खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

कंपनीने त्यांच्या निवेदनात सांगितले आहे की मॉडेलनुसार वाहनाची किंमत वाढते. वाहन उत्पादक कंपनी खर्चात वाढ करताना ग्राहकांवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी काम करते पण काही खर्चिक गोष्टी बाजारात आणाव्या लागतात.

वाढती महागाई, कच्च्या मालाच्या किमती आणि वाढत्याॉ लॉजिस्टिक्स खर्चामुळे ऑटो उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मारुती सुझुकीच्या किमतीत वाढ (Maruti Suzuki’s price hikes )

मारुती सुझुकी इंडिया कंपनीने वाढत्या इनपुट आणि ऑपरेशनल खर्चाचे कारण सांगत एप्रिल २०२५ पासून ४% पर्यंत वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये वाहनांमध्ये ४% वाढ करण्याचे सांगितले होते. याशिवाय कंपनीने फेब्रुवारीमध्ये पुन्हा वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या, काही ठराविक निवडक मॉडेल्समध्ये १,५०० ते ३२,५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. मारुती ज्या गाड्यांच्या किमती वाढवल्या होत्या त्यात एंट्री लेव्हल हॅचबॅक मारुती अल्टो के१० ते ग्रँड विटारा यांचा समावेश होता. त्यानंतर कंपनीने त्यांच्या ब्रेझाच्या किमतीत वाढ केली होती. या वाढीव किमतीचा फायदा फक्त ग्राहकांनाच झालाह कारण मारुतीने त्यांच्या ब्रेझामध्ये अनेक नवीन सेफ्टी फीचर्स समाविष्ट केले होते ज्यामुळे या कारची किंमत वाढवलेली असल्याचे कंपनीने सांगितले होते.

ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे मारुती सुझुकी

मारुती सुझुकी ही ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून तिच्या मायलेजसाठी ओळखली जाते.या कंपनीचा प्रत्येक मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. कंपनी देशात सर्वात जास्त एंट्री लेव्हल कार्स विकते. मारुती सुझुकी ही जपानमधील सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात या कंपनीचे मोठे योगदान आहे.