ऑटोमोबाईल मार्केटमध्ये दिवाळीची चमक दिसायला लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या अनेक डिस्काउंट ऑफर देत आहेत. यातच आता मारुती सुझुकीच्या अल्टो गाडीवर देखील बंपर सूट दिली जात आहे. जाणून घेऊया या गाडीवर किती मिळेल सूट…
दिवाळी सणाच्या ऑफरचा एक भाग म्हणून मारुती अनेक नवीन गाड्यांवर चांगली सूट देत आहे. याचाच एक भाग म्हणून मारुती सुझुकीचा अल्टो ही कार दोन लाखांहूनही अधिक स्वस्त मिळत आहे. या कारची किंमत १.७५ लाख रुपये आहे. ही कार सहा महिन्यांची वॉरंटी आणि तीन मोफत सेवांसह येते. ही मारुतीची प्रमाणित कार असून त्याचा पुरावा कंपनीने दिलेली वॉरंटी आहे.
आणखी वाचा : ह्युंदाई कंपनीचा दिवाळी धमाका: ‘या’ चार गाड्यांवर १ लाखांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर्स
ही कार टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे आणि त्यासाठी तुम्ही डीलर्सशी संपर्क देखील करू शकाल. ही एक प्रमाणित कार आहे. पांढऱ्या रंगात येणाऱ्या या कारचे अनेक फोटो वेबसाइट्सवर आहेत. या कारची अवस्था फोटोमध्ये दिसत आहे.
२०१७ सालचे मॉडेल
मारुती अल्टो कार हे २०१७ सालचे मॉडेल असून ती आतापर्यंत ८६ हजार किलोमीटर धावली आहे. ही पेट्रोलवर चालणारी कार आहे. पेट्रोलवर चालणारी कार marutisuzukitruevalue.com वर मिळू शकते. ही कार सुलभ हप्त्यांसह आणि डाउनपेमेंट पर्यायांसह खरेदी केले जाऊ शकते. त्यासाठी कंपनीने ठरवलेल्या प्रक्रियेनंतरच निर्णय घेतला जाईल. सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी, त्याबद्दल दिलेली माहिती पूर्णपणे वाचा आणि समजून घेणे फार आवश्यक आहे.