Best Selling Used Car: भारतात जेवढी विक्री नव्या कारची होते तेवढीच जुन्या कारचीदेखील मोठ्या प्रमाणात होते. भारतात सेंकेंड हँड मार्केट फार मोठं आहे. ज्या लोकांचा कार घेण्याचा बजेट कमी असतो असे लोक सेकेंड हँड कार विकत घेतात. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या सेकेंड हँड कारची आकडेवारी पुढे आली. चला तर त्याबाबात सविस्तर जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती

CARS24 च्या अहवालानुसार, सेकंड हँड कार मार्केटमध्ये मारुती सुझुकी हा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड ठरला आहे. कंपनीचे Maruti Swift आणि Baleno हे Q1 २०२३ मध्ये विकले गेलेले सर्वात लोकप्रिय सेकंड हँड मॉडेल आहेत. स्‍विफ्टला सेकंड हँड मार्केटमधून सुमारे २.५ लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.

(हे ही वाचा : मारुती, महिंद्रा नव्हे तर ‘ही’ कार आहे देशातील सर्वात सुरक्षित कार, तुम्ही आणि तुमचं कुटुंब राहणार एकदम सेफ )

‘या’ शहरांमध्ये सर्वाधिक मागणी

पहिल्या तिमाहीत या प्लॅटफॉर्मवर खरेदी केलेल्या एकूण गाड्यांपैकी ४० टक्के गाड्या मारुती सुझुकीच्या होत्या. मारुती सुझुकीनंतर लोक ह्युंदाई, होंडा आणि रेनॉल्टच्या कारला प्राधान्य देत आहेत. लखनौ, पाटणा, कोची, सुरत आणि चंदीगडमध्ये २०२३ च्या पहिल्या तिमाहीत वापरलेल्या कारची सर्वाधिक मागणी होती. मेट्रो शहरांमध्ये, नवी दिल्ली सर्वाधिक वापरलेल्या कार खरेदीचे साक्षीदार आहे, त्यानंतर बंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि गुरुग्राम यांचा क्रमांक लागतो.

मारुती सुझुकी स्विफ्ट आणि ग्रँड i10 हे लखनौ आणि पाटणा येथील वापरलेल्या कारच्या बाजारात सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल होते. भारतात विकत घेतलेल्या सर्वात स्वस्त कार म्हणजे मारुती सुझुकी 800 या बंगळुरूमध्ये १,२५,००० मध्ये आणि मारुती सुझुकी अल्टो या दिल्लीमध्ये १,३२,००० मध्ये. अहवालानुसार, भारतीयांनी १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कार विकल्या. २०२३ च्या केवळ ९० दिवसांमध्ये, Cars24 प्लॅटफॉर्मवर १२५० कोटी भारतीय ग्राहकांचा वाहन खरेदी आणि विक्रीचा कल दर्शविते.