Maruti Suzuki Car: देशात सर्वाधिक विकली जाणारी कार कोणती याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुम्ही विचार केला असेल, तर कदाचित तुमच्या मनात मारुती सुझुकी अल्टो किंवा वॅगनआरचे नाव आले असेल, कारण अल्टो आणि वॅगनआर या दोन्ही वेगवेगळ्या महिन्यांत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार आहेत. पण, मार्च महिना (२०२३) वेगळा होता. मार्च २०२३ मारुती सुझुकी अल्टो आणि वॅगनआर या दोन्ही कार सर्वाधिक विकल्या जाणार्या कारचे विजेतेपद मिळवण्यात अयशस्वी ठरल्या, तर या मारुतीच्या एका कारने बाजाी मारली आहे.
‘या’ कारच्या मागे लागले भारतीय
गेल्या महिन्यात मारुती स्विफ्टची सर्वाधिक विक्री झाली आहे. वार्षिक आधारावर मारुती सुझुकी स्विफ्टच्या विक्रीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्च (२०२२) महिन्यात एकूण १३,६३२ युनिट्सची विक्री झाली होती, तर यावर्षी मार्च (२०२३) मध्ये स्विफ्टच्या १७,५९९ युनिट्सची विक्री झाली. यासोबतच वॅगनआर आणि अल्टो सारख्या कारलाही मागे टाकले आहे. तथापि, वॅगनआर ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे, तर अल्टोलाही टॉप १० कारच्या यादीत स्थान मिळू शकले नाही.
(हे ही वाचा : Creta चा खेळ संपणार? पाच दिवसांनी देशात येतेय सर्वात सुरक्षित कार, मोठ्या कुटुंबासाठी ठरेल बेस्ट)
उत्कृष्ट मायलेज
तुम्हाला मारुती स्विफ्टमध्ये ११९७cc पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल, ज्यामध्ये ८८.५bhp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. तुम्हाला ही हॅचबॅक कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायामध्ये देखील पाहायला मिळेल. त्याचवेळी, तुम्हाला मारुती स्विफ्ट या सेगमेंटमध्ये २३.७६ kmpl पर्यंत उत्कृष्ट मायलेज देखील पाहायला मिळेल. तुम्हाला ५ सीटर मारुती स्विफ्ट कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या ४ ट्रिम लेव्हलच्या ९ प्रकारांमध्ये पाहायला मिळेल. ५.९२ लाख रुपयांपासून ते ८.८५ लाख रुपयांपर्यंतची ही कार आकर्षक लूक आणि उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे.