मारुती सुझुकीची WagonR ही एक प्रसिद्ध हॅचबॅक कार आहे, ज्यामध्ये तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत अधिक जागा मिळते. या कारमध्ये चार किंवा ५ लोक सहज बसू शकतात. या कारचा एक प्रकार देखील आहे जो अनेकांना माहित नाही. “Maruti Suzuki WagonR Tour H3” असे या प्रकाराचे नाव आहे. तुम्हाला ते सामान्य वेरिएंटपेक्षा स्वस्त मिळते आणि मायलेजही खूप जास्त आहे.
किंमत किती आहे?
WagonR Tour H3 चे दोन प्रकार H3 आणि H3 CNG येतात. WagonR टूर H3 ची किंमत ५.५० लाख आहे आणि टूर H3 CNG ची किंमत ६.४० लाख (एक्स-शोरूम) आहे. हे नेहमीच्या WagonR व्हेरियंटपेक्षा किंचित स्वस्त आहे, ज्यामुळे टॅक्सी चालकांना लक्षात घेऊन ते तयार करण्यात आले आहे. मात्र, तरीही त्यात फिचर्सची कमतरता नाही.
(हे ही वाचा : ६७ हजाराच्या बजाजच्या ‘या’ बाईकसमोर Hero न Honda सर्व पडतात फिक्या? १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ९० किमी )
WagonR Tour H3 मध्ये १.०-लिटर के-सीरीज पेट्रोल इंजिन आहे. हे आयडल स्टार्ट/स्टॉप वैशिष्ट्यासह येते, जे मायलेज सुधारते. हे पेट्रोल व्हेरियंटसह २४.५ kmpl चे मायलेज देते तर CNG प्रकारात ते ३४.७३ km/kg मायलेज देते.
या कारमध्ये ५ लोक आरामात बसू शकतात. इंधन टाकीची क्षमता ३२ लीटर आहे आणि बूट स्पेस ३४१ लीटर आहे. हीटरसह मॅन्युअल एअर कंडिशनर, पुढील आणि मागील एकात्मिक हेडरेस्ट्स आणि फ्रंट पॉवर विंडो यासारख्या वैशिष्ट्यांमुळे तुमचा प्रवास आरामदायी होतो. सुरक्षेच्या दृष्टीनेही यात ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टीम, सीट बेल्ट टेंशनर आणि फोर्स लिमिटर, सेंट्रल डोअर लॉकिंग आणि स्पीड लिमिटिंग फंक्शन मिळते.