लोकप्रिय हॅचबॅक मारुती बलेनोची नवीन फेसलिफ्ट आवृत्ती नुकतीच लाँच करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने आणखी एक लोकप्रिय हॅचबॅक कार मारुती वॅगनआर नवीन इंजिन आणि वैशिष्ट्यांसह अपडेट केली आहे. मारुती वॅगनआर २०२२ मध्ये कंपनीने तेच इंजिन बसवले आहे, जे कंपनीने नवीन Maruti Celerio मध्ये लावले आहे. त्यानंतर या कारचा मायलेज आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. मारुती वॅगनआरच्या अद्ययावत इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने अपडेटसह १.० लिटर आणि १.२ लीटर इंजिन बाजारात आणले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या दोन इंजिन प्रकारांद्वारे, ग्राहकांना मारुती वॅगनआरमध्ये पूर्वीपेक्षा चांगली इंधन क्षमता मिळेल. ही दोन्ही इंजिन कूल्ड ईजीआर आणि आयएएस व्यतिरिक्त ड्युअल जेट आणि ड्युअल व्हीव्हीटी सारख्या नवीनतम तंत्रज्ञानाने बनवण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती वॅगनआर २०२२ च्या १.० लीटर पेट्रोल इंजिनबद्दल सांगायचे तर, हे इंजिन ६७ एचपी पॉवर जनरेट करते, जे आधीच्या इंजिनपेक्षा १ एचपी कमी आहे. आता हे इंजिन ड्युअल फ्युएल व्हेरियंटमध्ये चालते आणि पेट्रोलवर ६५ एचपी पॉवर आणि सीएनजीवर ५७ एचपी पॉवर निर्माण करेल. मारुती वॅगनआर २०२२ च्या १.२ लीटर इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, हे इंजिन कंपनीने त्याच्या लोकप्रिय हॅचबॅक बलेनो २०२२ मधून घेतले आहे, जे पूर्वीपेक्षा जास्त पॉवर जनरेट करते. हे १.२ लिटर इंजिन यापूर्वी ८३ एचपी पॉवर जनरेट करत होते आणि आता ९० एचपीची पॉवर जनरेट करते.

MG Motor कंपनीची ZS EV ग्राहकांना मर्यादित कालावधीसाठी मोफत चार्जिंग सुविधा

मारुती वॅगनआर २०२२ ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कंपनीने अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्य दिली आहेत, यासह कारच्या आतील आणि बाहेरील भागात काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. यात एक ब्लॅक-आउट अॅलॉय व्हील जोडण्यात आले आहे. मारुती वॅगनआर २०२२ च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत ५.३९ लाख रुपये (एक्स-शोरूम) सह बाजारात लाँच केली आहे आणि टॉप व्हेरिएंटवर जाताना ही किंमत ७.१० लाख रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti wagonr 2022 update in engine improve mileage rmt