Used Cars Offers: कार सेक्टरमध्ये कमी बजेटच्या हॅचबॅकची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे, ज्यांच्या किमती ३.५९ लाखांपासून सुरू होतात आणि ८ लाखांपर्यंत जातात. या सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या कारपैकी आज मारुती सुझुकीच्या वॅगनआर कारबद्दलची माहिती जाणून घेऊया. या कारने तिच्या किमतीव्यतिरिक्त, केबिन स्पेस, मायलेज आणि बॉक्सी डिझाइनमुळे अनेक वर्षांपासून बाजारात मजबूत पकड राखली आहे. शिवाय ही कार सर्वोत्तम विक्री केलेल्या कारमध्ये गणली जाते.
तुम्ही जर शोरूममधून मारुती वॅगनआर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला ५.५४ लाख ते ७.४२ लाख रुपये खर्च करावे लागतील. मात्र, तुमचे एवढे बजेट नसेल तर या कारचे सेकंड हँड मॉडेल तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. तुम्हाला आम्ही अशा काही डील्स सांगणार आहोत, ज्यामुळे मारुती वॅगनआर ही कार अर्ध्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. सेकंड हँड मारुती वॅगनआर वर उपलब्ध असलेल्या या ऑफर सेकंड हँड वाहनांच्या खरेदी, विक्री आणि सूचीशी संबंधित वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून घेतल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आजच्या सर्वोत्तम डीलची माहिती सांगणार आहोत.
हेही वाचा- VIDEO: एमजी मोटर्सने भारतात लॉन्च केले ‘हे’ लिमिटेड एडिशन; किंमत आणि फीचर्स एकदा पाहाच
सेकंड हँड मारुती वॅगनआर
मारुती वॅगनआरच्या ऑफर्सची पहिली डील DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये नोंदणीकृत WagonR चे २०११ चे मॉडेल येथे सूचीबद्ध करण्यात आले आहे. विक्रेत्याने कारची किंमत १ लाख १० हजार रुपये ठेवली आहे आणि ही कार खरेदी केल्यानंतर, तुम्हाला सुलभ डाउन पेमेंटसह एक फायनान्स देखील मिळू शकतो.
OLX वेबसाईट
वापरलेल्या मारुती वॅगनआरवरील दुसरी सर्वात स्वस्त डील OLX वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. येथे मारुती वॅगनआरचे २०१२ चे मॉडेल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे, ज्याची आरटीओ नोंदणी हरियाणाची आहे. या कारची किंमत १.८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच या कारबरोबर कोणतीही फायनान्स योजना किंवा ऑफर मिळणार नाही.
CARTRADE वेबसाईट
मारुती वॅगनआर सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध तिसरी सर्वात स्वस्त डील CARTRADE वेबसाईटवर उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशमध्ये नोंदणीकृत WagonR चे २०१४ चे मॉडेल येथे दाखवण्यात आले आहे. या कारची किंमत ३ लाख रुपये ठेवण्यात आली असून यासोबत फायनान्स प्लॅनची सुविधाही मिळणार आहे.