Maruti WagonR sales Crosses the 30 Lakh milestone: जेव्हा जेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबासाठी कार खरेदी करण्याची चर्चा होते तेव्हा त्या कंपनीच्या नावात मारुती सुझुकीचे नाव येते आणि कारचे नाव आल्यावर सर्वात पहिले नाव मनात येते ते म्हणजे WagonR. दोन दशकांहून अधिक काळ लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या वॅगन आरने आता एक नवा विक्रम रचला आहे. कारच्या विक्रीने ३ दशलक्ष म्हणजेच ३० लाख युनिट्सचा आकडा गाठला आहे, अशी माहिती मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी दिली.
श्रीवास्तव म्हणाले की, वॅगनआरच्या विक्रीची टक्केवारी पाहिली तर लोकांच्या प्राधान्यक्रमात त्याचा समावेश होतो. २४ टक्के लोक कार अपग्रेड करताना वॅगनआरला पहिली पसंती देतात. ते म्हणाले की, गेल्या १० वर्षांपासून वॅगन आर ही अशी कार आहे जी सतत टॉप १० च्या यादीत समाविष्ट आहे. दुसरीकडे, गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर सर्वाधिक विक्री होणारी प्रवासी कार म्हणून वॅगनआरने आपले स्थान कायम ठेवले आहे. ते म्हणाले की कारची रचना, जागा, व्यावहारिकता आणि चांगले मायलेज या काही गोष्टी आहेत ज्यामुळे कार ३० लाखांहून अधिक कुटुंबांचा भाग बनली आहे.
(हे ही वाचा : २० हजारात घरी आणा देशातली बजाजची लोकप्रिय स्पोर्ट्सबाईक, महिन्याला केवळ ‘इतक्या’ हजारांचा EMI )
Maruti Suzuki WagonR ‘अशी’ आहे खास
Maruti Suzuki WagonR ही एक सध्या बाजारात असणारी बेस्ट फॅमिली हॅचबॅक कार आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी ही कार बनली आहे. वॅगन आर कंपनी एरिना शोरूमद्वारे विकली जाते. कारला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच दोन पेट्रोल इंजिन पर्याय आहेत. हे १.० लीटर पेट्रोल इंजिनसह येते जे कंपनी फिट सीएनजीच्या पर्यायामध्ये देखील दिले जाते. कार १.२ लीटर पेट्रोल इंजिनसह देखील उपलब्ध आहे.