Maruti Suzuki: सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतींनी हैराण झालेले नागरिक इलेक्ट्रिक वाहनांची निवड करत आहेत. त्यामुळे देशातल्या अनेक प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी आपापली इलेक्ट्रिक वाहनं लाँच केली आहेत. त्यातल्या बहुतांश वाहनांना चांगला प्रतिसात मिळत आहे. एकीकडे असं चित्र असताना देशातली सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकी सुद्धा मागे राहिलेली नाही. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी बाजारात वाढल्यानंतर कंपनीने या सेगमेंटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या नव्या वर्षात आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.

Maruti Suzuki ‘ही’ Electric Car करणार लाँच

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता आगामी २०२३ ऑटो एक्सपोमध्ये त्याचे पहिले सर्व-इलेक्ट्रिक मॉडेल, ‘YY8’ सादर करू शकते. मारुती सुझुकीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ५०० किमी पर्यंतची रेंज देईल.

(हे ही वाचा : Mahindra Thar पासून ते Maruti Jimny पर्यंत ‘या’ आलिशान कार होणार १५ लाखांच्या आत लाँच, पाहा यादी )

Maruti YY8 इलेक्ट्रिक SUV ‘अशी’ असेल खास

मारुती YY8 इलेक्ट्रिक SUV 27PL बोर्न-इलेक्ट्रिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित असेल, जी टोयोटाच्या 40PL ग्लोबल प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. EV विभागातील डिझाइन ट्रेंडच्या अनुषंगाने, YY8 मध्ये लहान ओव्हरहॅंग्स असतील, चाके शक्य तितक्या बाजूला ठेवल्या जातील, ज्यामुळे आत अधिक जागा मिळेल.

Maruti YY8 इलेक्ट्रिक SUV बॅटरी

मारुती YY8 इलेक्ट्रिक SUV मध्ये ४८ kWh आणि ५९ kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळू शकतात. पूर्ण चार्ज झाल्यावर, हे बॅटरी पॅक ४०० किमी आणि ५०० ​​किमीची रेंज देऊ शकतात. पॉवर आउटपुट १३८ hp ते १७० hp पर्यंत अपेक्षित आहे. यामध्ये टू-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: इव्हेंट, कुठे आणि केव्हा होईल? तुम्हाला प्रवेश कसा मिळेल? कोणत्या कंपन्या करणार वाहने लाँच? जाणून घ्या सविस्तर)

Maruti YY8 इलेक्ट्रिक SUV किंमत किती असणार?

ही SUV Tata Nexon EV पेक्षा स्वस्त असणार असल्याची माहिती आहे. मारुती YY8 इलेक्ट्रिक SUV ची किंमत १३ लाख ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

Story img Loader