Best-Selling SUVs in India for July 2023: सध्या, SUV कार ही देशातील बहुतांश ग्राहकांची पहिली पसंती आहे. त्यामुळे कार उत्पादक कंपन्या या  SUV वरअधिक लक्षकेंद्रीत करत आहेत. त्यामुळे बाजारात SUV कारच्या ऑप्शन्सची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्याचा कारच्या विक्रीचा अहवाल समोर आला आहे. या एकंदरीत विक्री झालेल्या अहवालानुसार, मारुतीच्या एकट्या SUV कारनं अनेक मोठ्या कार्सना मागे टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात ‘या’ एसयुव्हीचा बोलबाला

मारुती सुझुकी ब्रेझा खूप लोकप्रिय झाली आहे. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. इतकेच नाही तर मारुती ब्रेझा ही जुलै (२०२३) महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. टाटा नेक्सान, पंच आणि ह्युंदाई क्रेटा यांसारख्या इतर लोकप्रिय एसयूव्हींना तिने मागे टाकले. त्याची विक्री वार्षिक आधारावर सुमारे ७० टक्क्याने वाढली आहे. यासह, जुलै २०२३ मध्ये, तिने सर्वाधिक विक्री होणारी SUV चा किताब आपल्या नावी केला आहे.

(हे ही वाचा : बाकी ईव्हींची उडाली झोप, देशात ‘या’ दोन लक्झरी कारचे बुकींग सुरु, लूक पाहून पडाल प्रेमात, एकदा चार्ज केल्यानंतर धावेल… )

जुलै २०२३ मध्ये मारुती ब्रेझाच्या १६,५४३ युनिट्सची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत फक्त ९७०९ युनिट्सची विक्री झाली होती. अशा परिस्थितीत त्याची विक्री ७९ टक्क्यांनी वाढली आहे. देशात विकल्या गेलेल्या सर्व कारबद्दल बोलायचे झाले तर जुलै महिन्यात ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. याच्या वर, फक्त मारुती सुझुकी स्विफ्ट आणि मारुती सुझुकी बलेनोची विक्री झाली आहे, ज्यांनी अनुक्रमे १७,८९६ आणि १६,७२५ युनिट्स विकल्या आहेत.

सर्वाधिक विक्री होणारी टॉप-5 SUV (जुलै २०२३)

मारुती ब्रेझा – १६,५४३ युनिट्स विकल्या गेल्या
ह्युंदाई क्रेटा – १४,०६२ युनिट्स विकल्या गेल्या
मारुती फ्रॉन्क्स – १३,२२० युनिट्स विकल्या गेल्या
टाटा नेक्सान – १२,३४९ युनिट्स विकल्या गेल्या
टाटा पंच – १२,०१९ युनिट्स विकल्या

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marutis popular compact suv the brezza was the largest selling suv in july at 16543 units pdb