Maserati Grecale SUV Launched In India : जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी वाहन निर्मिती करणारी कंपनी Maserati ने आपली नवीन SUV Grecale भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. तीन वेगळ्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या एसयूव्हीची किंमत १.३१ कोटी रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते.

Maserati Grecale SUV लाँच

Maserati ने भारतात लक्झरी SUV Grecale ही तीन व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे, ज्यामध्ये GT, Modena आणि Trofeo यांचा समावेश आहे. लवकरच या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनदेखील कंपनी लाँच करू शकते.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Tata Motors January Offer
Tata Motors January Discount : ग्राहकांसाठी खुशखबर! टाटा पंच ईव्ही अन् टाटा टियागो ईव्ही वर ८५ हजारांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या सविस्तर
rupali bhosale buys new mercedes car
मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : कोणती दुचाकी आहे लयभारी? फिचर्सपासून किंमतीपर्यंत; जाणून घ्या, एका क्लिकवर
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!

२१ स्पीकर आणि ADAS सारखे दमदार फीचर्स

या एसयूव्हीमध्ये एकापेक्षा एक असे दमदार फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. लक्झरी SUV मधील फीचर्समध्ये हेड-अप डिस्प्ले, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि बरोबर 8.8 इंची स्क्रीन, कार्बन फायबर, ॲल्युमिनियम इन्सर्ट, 1200 वॅट्सच्या २१ स्पीकर्ससह 3D साउंड सिस्टम, लेव्हल- 1 ADAS, 58AS लिटर बूट स्पेस, एअर सस्पेंशन, थ्री झोन ​​क्लायमेट कंट्रोल सिस्टमचा समावेश आहे.

दोन इंजिनचा पर्याय

एसयूव्हीमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. त्याच्या बेस आणि मिड व्हेरियंटमध्ये दोन लिटर क्षमतेचे चार-सिलेंडर माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनमधून एसयूव्हीला 300 आणि 330 bhp पॉवर मिळते. SUV च्या टॉप व्हेरियंटमध्ये तीन लिटर क्षमतेचे V6 इंजिन आहे, जे 530 bhp आणि 620 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ते फक्त 3.8 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 285 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ZF 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सर्व व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे.

किंमत १.३१ कोटी रुपयांपासून सुरू

Maserati Grecale SUV ची एक्स-शोरूम किंमत 1.31 कोटी रुपयांपासून सुरू होते. ही किंमत त्याच्या GT व्हेरियंटसाठीही सेम आहे. मोडेना व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १.५३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि तिचा टॉप व्हेरिएंट ट्रोफियो २.०५ कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीवर खरेदी केला जाऊ शकतो.

Story img Loader