Matter Aera E-Bike Launched: इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक बाईक Matter Aera e-bike ची नोंद आहे. ही देशातील पहिली गिअरची इलेक्ट्रिक बाईक आहे. जी गुजरातमधील अहमदाबाद येथील इलेक्ट्रिक व्हीकल बनवणारी स्टार्टअप मॅटर एनर्जीने लाँच केली आहे. मॅटर एनर्जीने ही बाईक चार व्हेरिएंटमध्ये आणली आहे. ज्यात पहिले Matter Aera 4000, दुसरे Matter Aera 5000, तिसरे Matter Aera 5000+ आणि चौथे Matter Aera 6000+ यांचा समावेश आहे.
Matter Aera e-bike कशी आहे खास?
4 स्पीड गिअरबॉक्ससह Matter Aera 5000 आणि Matter Aera 5000+ च्या राइडिंग रेंजच्या संदर्भात, कंपनीचा असा दावा आहे की या बाईक एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर १२५ किमी रेंज देतात. Matter Aera 6000+ ची रेंज १५० किमी असल्याचे सांगितले गेले आहे.
वेगासंदर्भात, मॅटर एनर्जीचा असा दावा आहे की, या बाईकने ६ सेकंदांपेक्षा कमी तासात ० ते ६० किलोमीटर प्रति तासाचा वेग प्राप्त केला आहे. कंपनीने या बाईकमध्ये चार राइडिंग मोडचा पर्याय देखील दिला आहे. या बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेकसह मॅटर एनर्जीने एकच चॅनेल अँटी -लॉक ब्रेकिंग सिस्टम जोडली आहे.
(हे ही वाचा : दोन दिवसातच बाजारपेठेत येऊन टाटाचं मार्केट खातेय ‘ही’ नवी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार )
Matter Aera e-bike बॅटरी आणि मोटर पॉवर
या बाईकमध्ये, कंपनीने ५ किलोवॅट आणि ६ kWh क्षमता बॅटरी पॅकचा पर्याय दिला आहे जो लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. या बॅटरी पॅकला सामान्य चार्जरने चार्ज केल्यास चार्जिंग ५ तासांत पूर्ण चार्ज होते, तर फास्ट चार्जरसह चार्जिंग केली तर, २ तासात पूर्ण चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे.
Matter Aera e-bike वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यांविषयी बोलताना, कंपनीने 4 जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ७ इंच टचस्क्रीन एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिले आहे जे बॅटरीचा वापर, दुचाकी शेअर, क्रॅश अॅलर्ट सूचना देते. या व्यतिरिक्त, ओटीए अद्यतने आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील जोडली गेली आहे.
(हे ही वाचा : ग्राहकांची मज्जाच मजा! बाईकच्या किमतीत घरी आणा मारुतीची सर्वात सुरक्षित कार, पाहा डिटेल्स )
Matter Aera e-bike बुकिंग सुरु
कंपनीने या बाईकचे Matter Aera 5000 आणि Matter Aera 5000+व्हेरिएंटसाठी प्री बुकिंग उघडले आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही बाईक बुक करू शकतात. मार्च मध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना एप्रिल महिन्यात डिलिव्हरी केली जाईल. जे ग्राहक Matter Aera इलेक्ट्रिक बाईक खरेदी करतात, त्यांना ३ वर्षांसाठी रोडसाइड असिस्टेंस, ३ वर्षे किंवा अमर्यादित किलोमीटरची वारंटी दिली जाईल.
Matter Aera e-bike किंमत
कंपनीने या बाईकची किंमत १,४३,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह सुरू केली आहे, तर टाॅप माॅडेलची किंमत १,५३,९९९ रुपये आहे. ही किंमत प्री रजिस्ट्रेशन आणि FAME ।। सब्सिडी सोबत ठेवण्यात आली आहे.