Mercedes AMG E53 Cabriolet: आलिशान आणि महागड्या गाड्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. एखादी लग्झरी कार बाजूने गेली की नजर तिच्याकडे वळतेच. या गाड्यांची किंमत काेट्यवधी रुपये असते. आता याच महागड्या कारचा शौक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ आपली आलिशान कार लाँच करणार आहे. ही कार जबरस्त फीचर्सने सुसज्ज असणार आहे. मर्सिडीज-बेंझ ‘Mercedes AMG E53 Cabriolet’ ही आलिशान कार लाँच करणार आहे.
‘Mercedes AMG E53 Cabriolet’ या आलिशान कारमध्ये काय असेल खास?
या नवीन कारमध्ये ३.०L टर्बोचार्ज्ड, ६-सिलेंडर इंजिन पर्याय उपलब्ध असेल. हे इंजिन ४३५bhp पॉवर आणि ५२०Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर हे इंजिन ९-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले गेलेले आहे.
(हे ही वाचा : सिंगल चार्जवर पोहोचा दिल्ली ते देहरादून; ‘या’ आहेत कमी किमतीत मोठ्या रेंजची हमी देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर )
BMW X6 मध्ये २९९८cc, ६-सिलेंडर, पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. ही कार ५-सीटर पर्यायामध्ये बाजारात उपलब्ध आहे. या कारच्या आतील भागात, डॅशबोर्डचा लेआउट आणि डिझाईन E53 सेडानसारखे असेल. कारमध्ये बर्मेस्टर साउंड सिस्टम, १२.३-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह फ्लॅट-बॉटम AMG स्टीयरिंग व्हील आणि वायरलेस ऍपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो फीचर देखील मिळते.
‘Mercedes AMG E53 Cabriolet’ कधी होणार लाँच?
Mercedes AMG E53 Cabriolet ही कार ६ जानेवारी म्हणजे उद्या शुक्रवारी लाँच होणार आहे. ही कार फक्त ४.० सेकंदामध्ये ०-१०० किमी प्रतितास वेग गाठू शकते, असा कंपनीने दावा केला आहे.
‘Mercedes AMG E53 Cabriolet’ किंमत किती असेल ?
भारतामध्ये ही कार CBU मार्गाने येणार आहे. त्यामुळे या गाडीची किंमत जवळपास १.२ कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. Mercedes Benz AMG E53 Cabriolet ही कार बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या BMW X6 या कारसोबत स्पर्धा करेल.