Mercedes Benz AMG EQS 53 launched in India : मर्सिडीज बेंन्झची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात झाली लाँच झाली आहे. मर्सिडीज बेंन्झ एएमजी इक्यूएस 53 असे या नव्या कारचे नाव आहे. या कारचे फीचर्स जाणून घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. भारतीय बाजारात या गाडीची किंमत २.४५ करोड रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार सध्या भारतातील सर्वात महाग इलेक्ट्रिक कार आहे. या कारचे आकर्षक फीचर्स जाणून घेऊया

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फीचर्स

मर्सिडीज बेंन्झ एएमजी इक्यूएस 53 ही कार या कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. मागच्या वर्षी या कारला इंटरनॅशनल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले होते. इक्यूसीनंतर ही मर्सिडीजचे पूर्णतः इलेक्ट्रिक असणारे हे दुसरे वाहन आहे. पूर्णतः इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या कंपनीचा उद्देशा या कारने पूर्ण केला आहे. या कारमध्ये सर्वात उत्तम मानली जाणारी एएमजी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. हे शून्य उत्सर्जित वाहन आहे. म्हणजेच या करमधून कोणताही घातक वायूचे किंवा प्रदूषित वायूचे उत्सर्जन होत नाही. यासह मर्सिडीज ब्रँडच्या सर्व लक्झरी या कारमध्ये उपलब्ध आहेत.

Top Mileage bikes : दमदार मायलेजसह १०० किमीपेक्षा जास्त चालणाऱ्या स्वस्त बाईक्स कोणत्या? जाणून घ्या

लूक आणि डिझाईन

या कारचा लूक आणि डिझाईन अतिशय आकर्षक करण्यात आले आहे. याचे फ्रंट बोनट विंग्सना ओव्हरलॅप करणारे आहेत. दरवाज्याजवळचे फ्लॅश हँडल जे स्पर्श होताच उघडतात, प्रती लाईट १.३ मिलियन पिक्सल असणारे डिजिटल एलइडी लाईट थ्रीडी हेलिक्स डिझाइनमध्ये एलईडी दिवे असलेले फ्लॅश टेल गेट, टेलगेटवरील स्टार बॅज यासारख्या गोष्टी या गोष्टींमुळे कार अधिक आकर्षक दिसत आहे.

बॅटरी, रेंज आणि स्पीड

मर्सिडीज एएमजी इक्यूएस 53 मध्ये १०७.८ kWh लिथियम-आयन बॅटरी उपलब्ध आहे. ज्यामध्ये २०० kWh पर्यंत फास्ट चार्ज पर्यायदेखील उपलब्ध आहे. कार्यक्षमतेच्या बाबतीत ही कार ब्रँडच्या नावाप्रमाणेच आहे. ही कार ७६२ एचपी पॉवर आणि १,०२० एनएम इतका कमाल टॉर्क जनरेट करते. मर्सिडीज-बेंझ एएमजी इक्यूएस 53 कारचा सर्वाधिक वेग २५० किमी प्रतितास आहे आणि ती केवळ ३.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग एक्सलरेट करू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercedes amg eqs 53 launched in india check price range and features pns