मर्सिडीजमे नवीन लक्झरी मर्सिडीज AMG S 63 E-Performance कार लॉंच केली आहे. या कारला कंपनीकडून दमदार लूक आणि लेटेस्ट फीचर्स देण्यासाठी 4 सीटर केबिन दिली आहे. त्यासोबतच या कारमध्ये नवीन एस 63 मध्ये 4.0-L ट्विन-टर्बोचार्जड V8 इंजिन, जे 612hp पॉवर, 900NM चा पीक टॉर्क असणार आहे. 140 kw ची इलेक्ट्रीक मोटार आणि 802 hp आणि 1,430 Nm चे एकूण आउटपुट आणि ऑल-व्हील-ड्राइव्हसह स्टॅडर्डसह ही कार डिझाइन करण्यात आली आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह ई-मोटर म्हणजे चार्जिंगवर चालवता येणार आहे. त्यासाठी 13.1 kWh हाय-व्होल्टेज बॅटरी देण्यात आली आहे.
पुढील एस-क्लास लाइन-अपमध्ये मर्सिडीज-एएमजी एस 65 मधील शक्तिशाली V12 असणार नाही, मात्र, हायब्रीड सेटअपमुळे मार्कला V8 आधारित वाहनातून अधिक शक्ती मिळणार आहे. 63 ई-परफॉर्मन्स द परफॉर्मन्स फ्लॅगशिप ने 3.3 सेकंदात 100 किमी/ताशी वेग गाठण्याचा दावा केला आहे. जो की मागील मॉडेलपेक्षा 0.2 सेकंद अधिक जलद असणार आहे. या कारचा कमाल वेग 250 किलोमीटर ताशी आहे. तर AMG ड्रायव्हर पॅकेजसह, तो 290 किलोमीटरपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
हेही वाचा- खुशखबर: ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा Mercedes-Benz; पाहा ऑफर्स
या कारला Panamericana फ्रंट ग्रिल ते S-Class सेडनवर पहिल्यांदाच देण्यात आलं आहे. याशिवाय “जेट-विंग डिझाइन” असलेला फ्रंट बंपर आणि साइड इनटेक ही दोन डिझाइन AMG ला देण्यात आली आहेत. यासह ट्रॅपेझॉइडल क्वाड टेलपाइप्स, 21 इंच (20s स्टॅंडर्ड) या कारला आहेत. चार सीटर केबिनच्या आतील भागात लेदर, बॅजिंग, MBUX इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि विशेष परफॉर्मन्स डिस्प्लेसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याव्यतिरिक्त, डिजिटल “डायनॅमिक सिलेक्ट” ड्राइव्ह मोड आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग कंट्रोल्ससह AMG-विशिष्ट टू-स्पोक स्टीयरिंग व्हील उपलब्ध आहे.
हेही वाचा- कारमधील टचस्क्रीनवर स्क्रॅच पडले आहेत का? त्यावर करा हे सोपे उपाय
यात इलेक्ट्रिक ड्रायव्हिंगसाठी सेटिंग्ज देण्यात आली आहेत. ही कार फक्त लाँग-व्हीलबेस कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असून ती सर्व लक्झरी, सुरक्षितता आणि आरामदायी फिजर्ससह सुसज्ज आहे. 2023 Mercedes-Benz S 63 E परफॉर्मन्स चे उत्पन्न पुढील वर्षी सुरू होणार असून या कारची किंमत किती असेल याबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.