Mercedes Benz Price in India: कार म्हटलं तर प्रत्यकाचे लक्ष जाते ते Mercedes आणि Audi luxury कारकडे. प्रत्येकाला वाटतं आपल्याकडेही या कार असाव्यात. जर तुम्ही नवीन मर्सिडीज बेंझ कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. या कारच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होणार आहे. कारण कंपनी कंपनी एप्रिल महिन्यापासून आपल्या वाहनांच्या किंमतीमध्ये २ लाख रुपयांवरून १२ लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे. इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची तीन महिन्यांमधील ही दुसरी वेळ आहे. १ एप्रिल २०२३ पासून कंपनीच्या मॉडेल रेंजची (एक्स-शोरूम) किंमत ५ टक्कयांनी वाढणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर यांनी सांगितले की, कंपनी युरोवर नजर ठेवून आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रुपयांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतातील संपूर्ण व्यवसायावर झाला आहे.
हेही वाचा : Mercedes, Audi luxury cars आता ‘इतक्या’ स्वस्तात; पाहा हा घसघशीत ऑफर कुठे मिळतेय
एप्रिल महिन्यापासून A-Class limousine च्या किंमतीमध्ये २ लाख रुपयांची वाढ होणार आहे. GLA SUV वरच्या S 350d लिमोझिनच्या किंमतीमध्ये ७ लाख रुपयांनी वाढणार आहेत. तर टॉप एन्ड मर्सिडीज Maybach S 580 ची किंमती १२ लाखांनी वाढणार आहेत. मर्सिडीजच्या विकल्या जाणाऱ्या कार्स वापरकर्ते कर्ज घेऊन खरेदी करतात. किंमतीमध्ये वाढ झाल्याने त्यांना त्यांच्या EMI मध्ये २,००० ते ३,००० रुपयांचा फरक दिसले असे कंपनीचे म्हणणे आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाने आपल्या एका निवेदनात म्हटले की, इनपुट कॉस्टमध्ये आणि लॉजिस्टिक खर्चामध्ये सतत होणारी वाढ यामुळे कंपनीच्या ऑपरेशन कॉस्टवर खूप ताण येत आहे. यामुळे मर्सिडीज बेंझला त्यांची संपूर्ण मॉडेल रेंज कमी करण्यास भाग पडले आहे.