Mercedes-Benz G 400d: मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारपेठेमध्ये Updated G-Class line up सादर करत G 400d ही कार लॉन्च केली आहे. ही नवी कार मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या G 350d या कारची जागा घेणार आहे. ही कार २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. भारतीय ग्राहकांचा या कारला पसंती मिळाली होती. मिळालेल्या प्रतिसादामुळे कंपनीने नवीन 2023 Mercedes G 400d ही आलिशान कार तयार करण्याचा निर्णय घेतला असे काहीजण म्हणत आहेत. या कारची किंमत (एक्स-शोरुम) २.५५ कोटी रुपये आहे. G 350d च्या तुलनेमध्ये ही कार ८३ लाख रुपयांनी महाग आहे. Carindia.com ने दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीज या कारच्या माध्यमातून भारतामध्ये लक्झरी कार्सच्या विभागावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mercedes G 400d: स्पेसिफिकेशन्स आणि परफॉर्मन्स

Mercedes G 400d मध्ये 3.0-लीटर, OM656, इन-लाइन सिक्स-सिलेंडर डिझेल इंजिनचे 330hp व्हर्जन आहे. हे इंजिन 1,200-3,200rpm वर 700Nm टॉर्क जनरेट करते. 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनद्वारे सर्व चार चाकांमध्ये पॉवर ट्रान्सफर केली जाते. ही कार 0-100kph फक्त ६.४ सेकंदामध्ये जाते. इंजिन, ट्रान्समिशन, हायस्पीड यासारख्या अनेक बाबींमध्ये Mercedes G 400d ही कार G 350d पेक्षा वरचढ ठरते.

मर्सिडीज-बेंझच्या नव्या कारमध्ये ट्रेडिशनल लॅडर फ्रेमिंग आहे. त्यामुळे ऑफ-रोड ड्रायव्हिंग सेटअपसह एक विशेष G-मोड पूर्ण होतो. कारमध्ये 241mm ग्राउंड क्लीयरन्स आणि 700m पर्यंत वॉटर वेडिंग क्षमता आहे.

आणखी वाचा – बजाज प्लॅटिना, होंडा शाईनला टक्कर देण्यासाठी बाजारात लॉन्च झाली Hero ची ‘ही’ जबरदस्त बाईक, जाणून घ्या

Mercedes G 400d: व्हेरिएट्स आणि फीचर्स

या कारमध्ये AMG लाइन व्यतिरिक्त, एक नवीन G 400d Adventure Edition आहे. ही डिझाइन खास भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे. याला एक्सटिरीअर पेंट शेडचे डेझर्ट सॅन्ड नॉन-मेटलिक, विंटेज ब्लू नॉन-मेटलिक, ट्रॅव्हर्टाइन बेज मेटॅलिक आणि साउथ सीज ब्लू मेटॅलिक असे चार ऑप्शन्स मिळतात. तसेच ग्राहक G 400d लाईन-अपवर उपलब्ध असलेल्या २५ पेंट शेड ऑप्शन्सपैकी त्यांना आवडलेली कलर शेड निवडू शकतात. Mercedes G 400d चे भारतामध्ये दोन व्हर्जन्स आहेत. या दोन्ही मॉडेल्सची किंमत २.५५ कोटी रुपयांपासून सुरु होणार आहे.

Mercedes G 400d या अलिशान कारमध्ये 18-इंच, 5-स्पोक सिल्व्हर अलॉय व्हील; रुफ रॅक आणि स्पेअर-व्हील होल्डर; टेलगेट-माउंट केलेले फुल साइज स्पेअर व्हील आणि नप्पा चामड्यापासून तयार केलेले मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आहे. तसेच त्याच्या AMG लाईनला 20-इंच, मल्टी-स्पोक अलॉय व्हील्ससह अन्य उपकरणे देखील आहेत. स्लाइडिंग सनरुफ, बर्मेस्टर साउंड सिस्टीण, ६४ रंगाची लाइटिंग अशा खास फीचर्सचा समावेश देखील या कारमध्ये करण्यात आला आहे.

आणखी वाचा – बजाज-ट्रायम्फच्या नव्या 400cc बाईक्स ‘या’ दिवशी होणार लॉन्च; रॉयल एनफिल्डच्या अनेक बाईक्सना देणार टक्कर, वाचा सविस्तर

मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या या कारची डिलीव्हरी वर्षाच्या शेवटी सुरु होऊ शकते असे म्हटले जात आहे. सध्या कारची बुकिंग सुरु आहे. बुकिंगच्या बाबतीमध्ये कंपनी जुन्या ग्राहकांना अधिक प्राधान्य देत आहे. या कारच्या आगमनामुळे लँड रोव्हर डिफेंडर आणि टोयोटा लँड क्रूझर 300 या लोकप्रिय कार्ससमोर आव्हान निर्माण झाले आहे.