जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतात ‘Mercedes EQS 580 4MATIC’ लाँच केले आहे. ही एक इलेक्ट्रिक सेडान कार आहे. ही कंपनीची भारतात असेम्बल होणारी पहिली कार असून पुण्याजवळील कंपनीच्या चाकण प्लांटमध्ये कारची निर्मिती केली गेली आहे. जाणून घेऊया कारमध्ये काय आहे खास…
Benz EQS 580 4Matic ची फीचर्स आणि डिजाईन
मर्सिडीज-बेंझ EQS 580 इलेक्ट्रिक कारमध्ये ब्लॅक-आउट ग्रिल, ऑल-एलईडी हेडलॅम्प, फ्रेमलेस डोर, फ्लश हँडल आणि स्टँडर्ड १९-इंच मल्टी-स्पोक अलॉय व्हील आहेत. कारला शार्प एलइडी हेडलँप देण्यात आले आहेत जे तिला स्पोर्टी लूक देतात. कारला फ्रेमलेस दारे आहेत, फ्लश डोअर हँडल आणि १९ इंचचे अलॉय व्हिल देण्यात आले आहेत.
मर्सिडीज-बेंझ EQS 580 एक टोन्ड-डाउन लूक स्पोर्ट्स करते आणि EQS 53 AMG च्या तुलनेत थोडी लहान आहे. Mercedes-Benz EQS 580 ची लांबी ५,२१६ मिमी आहे. ही कार ५-स्पोक २०-इंच अलॉय व्हील आणि पाच एक्सट्रनल कलरसह उपलब्ध आहे. इक्यूएस ५८० ला ड्युअल मोटर सेटअप आहे. ही कार ५१६ बीएचपीची पावर आणि ८५६ एनएमचा टॉर्क निर्माण करते.
आणखी वाचा : मारुती सुझुकीची S-Presso CNG नव्या अवतारात बाजारपेठेत सादर; जाणून घ्या किंमत
बॅटरी
मर्सिडीज-बेंझ EQS 580 मध्ये १०७.८kWh बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. हे दोन इलेक्ट्रिक मोटर्सशी जोडलेले आहे. या कारचे एकत्रित पॉवर आउटपुट ५२३ bhp आणि ८५५ एनएम टॉर्क आहे. विशेष म्हणजे, मर्सिडीज-बेंझ EQS 580 कार एकदा चार्ज केल्यावर ARAI-प्रमाणित ८५७ किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. कारची सिस्टीम २००kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत
मर्सिडीज EQS 580 4MATIC भारतात १.५५ कोटी रुपये (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आली आहे.