मर्सिडीज बेन्झने २०२१ आणि २०२२ या वर्षात वितरीत केलेले काही मॉडेल्स तांत्रिक कारणामुळे परत मागवले आहेत. अमेरिकेतील काही गाड्यांच्या अॅक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट सॉफ्टवेअर आणि डिस्ट्रोनिक ड्रायव्हर असिस्टंटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आलं आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीने जवळपास ८,३९६ गाड्या परत मागवल्या आहेत. यात सी-क्लास, ई-क्लास, एस-क्लास, एसएल, ई-क्लास कूप आणि कन्व्हर्टेबल, सीएलएस, एएमजी जीटी ४-डोर कूप आणि स्टीअरिंग व्हीलने सुसज्ज असलेल्या EQS गाड्यांचा समावेश आहे.
कंपनीने सांगितलं की, चामड्याचे आवरण असलेले स्टिअरिंग व्हील लवकर गरम होत आहे. त्यामुळे हँड फ्री सेन्सरवर परिणाम होत आहे. स्टिअरिंगवरून हात काढल्यानंतरही त्यावर हात असल्याचं सेन्सर दर्शवत आहे. त्यामुळे ऑटो पायलट मोडमध्ये गाडी चालवताना अडचण येत होती. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीने पावलं उचलण्यात आली आहे. मर्सिडीजने जून २०२१ मध्ये अंतर्गत चाचणी ड्रायव्हिंगच्या आधारे तपासणीत ही बाब उघड झाली आहे. विशिष्ट स्टिअरिंग व्हीलवरील हँड्स-ऑफ डिटेक्शन योग्यरित्या कार्य करत नसल्याचे दिसून आलं होतं. मर्सिडीजने सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर समस्या दूर होईल असं सांगितलं आहे.
Battery Swapping Policy: येत्या ९० दिवसात बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू होणार, जाणून घ्या
मर्सिडीज लवकरच प्रभावित वाहनांच्या मालकांना मेलद्वारे सूचित करणार आहे आहे. जर तुमचे वाहन या रिकॉलमध्ये समाविष्ट आहे असे तुम्हाला वाटत असल्यास आणि आणखी काही प्रश्न असल्यास, तुम्ही मर्सिडीजशी संपर्क साधू शकता. यासाठी यूएस ग्राहक सेवा विभाग १-८००-३६७-६३७२ वर संपर्क साधता येईल.