ऑटो क्षेत्रात ऑटो पायलट मोडवर चालणाऱ्या कारची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षात स्वयंचलित गाड्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. स्वयंचलित गाड्यांमुळे लांबच्या प्रवासासाठी जाण्याचा मार्ग सहज मोकळा होतो. तसेच वेळेची बचतही होते आणि नुसतं गाडीत बसून प्रवासाचा आनंद घेता येतो. स्वयंचलित वाहनात चालकाची आवश्यकता नसते. एकदा ठराविक ठिकाणाची नोंद केल्यानंतर गाडी त्या ठिकाणी नेव्हिगेशनच्या माध्यमातून पोहोचवते. प्रगत तंत्रज्ञानात कॅमेरा, सेन्सर्स आणि रडारचा समावेश असल्याने हे फिचर्स स्वयंचलित गाड्यांमध्ये डोळे, कान आणि मेंदूसारखे काम करतात. त्यामुळे स्वयंचलित गाड्या या जास्त सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. पण हा दावा कितपत खरा असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे. अपघात झाल्यास कुणाला दोष दिला जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता मर्सिडीजने याबाबत आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. ऑटो पायलट मोडमध्ये गाडीचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कंपनीची असेल.
मर्सिडीज-बेंझने घोषणा केली की, जेव्हा मर्सिडीज-बेंझ कार ऑटो पायलटने सुसज्ज आहेत. ड्रायव्हरने ऑटो पायलट सहाय्यता प्रणाली चालू केल्यानंतर मर्सिडीज-बेंझ कारच्या ऑपरेशनसाठी कायदेशीररित्या जबाबदार आहे. याचा अर्थ असा की, ड्रायव्हर ऑटो पायलट फंक्शन वापरत असेल आणि अपघातात झाल्यास मर्सिडीज-बेंझला जबाबदार धरले जाईल. या निर्णयामुळे ऑटो पायलट ड्रायव्हिंगला प्रोत्साहन मिळेल, असा दावा केला जात आहे. तसेच मर्सिडीस-बेंझचा स्वतःच्या ऑटो ड्रायव्हिंग प्रणालीवरचा विश्वास देखील प्रतिबिंबित होत आहे. ड्राईव्ह पायलट सध्या जर्मनीमध्ये वापरलं जात असल्याचे वृत्त आहे. मर्सिडीज-बेंझ २०२२ च्या अखेरीस युनायटेड स्टेट्समध्ये ऑटो ड्रायव्हिंग प्रणाली सुरू करेल, असं सांगण्यात येत आहे.
भारतात लवकरच येणार ‘फ्लाईंग कार’!, सुझुकीने केला स्कायड्राईव्ह कंपनीसोबत करार
ड्राइव्ह पायलटचे वरिष्ठ विकास व्यवस्थापक ग्रेगर कुगेलमन यांनी सांगितलं की, “गेल्या वर्षाच्या अखेरीस L3 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त करणारी आम्ही पहिली कार कंपनी होतो.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की ,टेस्ला ऑटोपायलट आणि GM सुपरक्रूझ सध्या L2-स्तरीय किंवा निम्न असिस्टेड ड्रायव्हिंग सिस्टीम आहेत. ड्रायव्हरने नेहमी सिस्टम ताब्यात घेण्यासाठी आणि मॅन्युअली ड्रायव्हिंग करण्यास तयार असले पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो.
स्वयंचलित गाड्यांचं भविष्य काय आहे?
रस्त्यावर कमी वेगाने स्वयंचलित गाड्या चालवण्यासाठी नियम करणारा ब्रिटेन हा पहिला देश असेल, असं गेल्यावर्षी सरकारने सांगितल होतं. मात्र अद्याप त्याबाबतची अमलबजावणी झालेली दिसत नाही. दुसरीकडे भविष्याचा विचार केला तर स्वयंचलित गाड्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी कंपन्यांना अधिक सक्षम तंत्रज्ञान वापरावं लागणार आहे. येत्या काही वर्षात रस्त्यावर स्वयंचलित गाड्या धावताना दिसतील यात कोणतीही शंका नाही. यासाठी त्या त्या देशातील सरकारला नियमावली तयार करावी लागेल.