कार घेतल्यानंतर प्रश्न यतो तो म्हणजे तिच्यात बिघाड तर होणार नाही ना, आणि झाल्यास तिची दुरुस्ती कशी होणार. कुठलीही दगदग न होता कार दुरुस्ती झाली तर किती चांगले होईल, असे देखील अनेकांना वाटत असेल, तर तुमची इच्छा एक कंपनी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. एमजी मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी दुरुस्ती आणि देखभाल सेवा लाँच केली आहे. ही सेवा एमजीच्या ग्राहकांना दिलासा देणारी ठरणार आहे.
कंपनीने लाँच केली ही घरपोच सेवा
आता कार बिघडल्यास वर्कशॉपमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. कपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुमची कार जिथेकुठे बिघडली असेल त्या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी येऊन तिला दुरुस्त करतील. एमजी सर्व्हिस ऑन व्हिल्स असे या सेवेचे नाव आहे. ही डोरस्टेप रिपेयर आणि मेन्टेनंस सेवा आहे. कंपनीने ग्राहकांना तातडीने सुविधा देण्यासाठी पायलेट प्रोजक्ट म्हणून ही सेवा हाती घेतली आहे. या उपक्रमात कंपनी कार ग्राहकांना ब्रेकडाऊन, आपात्कालीन मदतीसह कारची सामान्य सर्व्हिसिंग सुद्धा देईल.
अहवालांनुसार, ही सेवा एका मोबाईल वर्कशॉप सारखी काम करेल. यात कंपनीचे प्रमाणित कर्मचारी सेवेत असतील, या शिवाय वाहनांची सर्व्हिसिंग आणि मेन्टेनंससाठी लागणारे सर्व आवश्यक सामान आणि भाग या वर्कशॉपमध्ये असतील. वर्कशॉपकडून कारच्या नियमित सर्व्हिस व्यतिरिक्त सदोश भाग बदलणे, इंजनमधील किरकोळ बिघाड, कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिकल किंवा बॅटरीची समस्या, टायर समस्या या सारख्या सुविधा जागेवरच देण्यात देईल.
अॅपने होईल बुकिंग
सर्व्हिस ऑन व्हिल्सची सेवा मिळवण्यासाठी ग्राहकाला कंपनीच्या अॅप किंवा संकोतस्थळावरून कस्टम लॉगिन करून बुकिंग करावी लागेल. एमजी कंपनीच्या या सेवेने देशात तिचे सर्व्हिस नेटवर्क वाढण्यास मदत होणार आहे.
सध्या या राज्यात सेवा सुरू
एमजी कंपनीची ही सेवा सध्या गुजरातमध्ये सुरू आहे. या सेवेची सुरुवात देशातील टायर १ आणि २ शहरांमध्ये करण्याची कंपनीची योजना आहे. ही सेवा एमजीच्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यांना वर्कशॉपऐवजी घरीच वाहन दुरुस्ती करून मिळेल. मात्र मोठे डॅमेज झाले असेल तर हे मोबाईल वर्कशॉप कारला कंपनीच्या वर्कशॉपमध्ये घेऊन जाईल. एकंदरीत कंपनीने ग्राहकांना ताणमुक्त सेवा देण्याचे ठरवले असल्याचेच यातून कळते, जे ग्राहकांसाठी सोयीचे ठरणार आहे.