MG Motor ने आपल्या इलेक्ट्रिक कार ZS EV चे नवीन बेस व्हेरियंट सादर केले आहे. ही एसयूव्ही MG ZS EV Excite आणि Exclusive trims या दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आले आहे. MG चे हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत Mahindra XUV400 आणि Tata Nexon EV Max शी स्पर्धा करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैशिष्ट्ये

एक्साइट बेस व्हेरियंटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर एअर कंडिशनिंग व्हेंट्स आणि नवीन आय-स्मार्ट कनेक्टेड कार यासारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. टॉप-स्पेक एक्सक्लुझिव्ह व्हेरियंटमध्ये पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस चार्जर, रिअर ड्रायव्हर असिस्ट यासारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.

आणखी वाचा : ‘हे’ काम कराच, अन्यथा; सहा एअरबॅग्सही आपला जीव वाचवू शकणार नाहीत!

आणखी वाचा

बॅटरी पॅक

MG ZS EV Excite आणि Exclusive trims मध्ये समान ५०.३kWh बॅटरी पॅक मिळतो. इलेक्ट्रिक मोटरला बॅटरीमधून पॉवर मिळते, जी १७४bhp आणि २८०Nm टॉर्क प्रदान करते. ही कार एका चार्जवर ४६१km ची ड्रायव्हिंग रेंज देते. हे ८.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग वाढविण्यास सक्षम आहे, असा कंपनीने दावा केला आहे.

किंमत

कंपनीने त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत म्हणजेच MG ZS EV Excite २२.५८ लाख रुपये असेल. ही MG ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार देखील आहे आणि एक्सक्लुझिव्ह व्हेरिएंट २६.४९ लाख रुपयांना खरेदी करू शकाल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg launches cheapest electric car pdb