MG Motor introduces the New 2024 MG ZS EV: MG Motors ने बाजारपेठेत आपली प्रसिद्ध इलेक्ट्रिक SUV MG ZS EV एका नवीन अवतारात लाँच केली आहे, त्यात एक प्रमुख अपडेट दिला आहे. कंपनीने एसयूव्हीला ADAS-2 लेव्हल सेफ्टीसह सुसज्ज केले आहे आ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन MG ZS EV मध्ये विशेष काय आहे?

कंपनीने यात एक नवीन ट्रिम एक्सक्लुझिव्ह प्रो जोडला आहे, आणि त्यात ADAS लेव्हल २ वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. आत्तापर्यंत, मागील व्हेरियंटमध्ये ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेव्हल चेंज असिस्ट आणि रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली होती. पण आता या नवीन अपडेटनंतर तुम्हाला ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्पीड असिस्ट सिस्टीम आणि अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देखील एसयूव्हीमध्ये मिळतील.

(हे ही वाचा : ‘या’ देशी सात सीटर कारचा जलवा! ९३ हजार ऑर्डर पेडींग, ९० आठवड्यांपर्यंत पोहोचला वेटिंग पीरियड, तरीही ग्राहक रांगेत )

नवीन इलेक्ट्रिक SUV मधील एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार सहाय्यक प्रणालीला कमी, मध्यम किंवा उच्च वर मॅन्युअली सेट करू शकता. या प्रणालीमध्ये हॅप्टिक, ऑडिओ आणि व्हिज्युअल अशा तीन स्तरांचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय, ZS EV मध्ये इतर कोणतेही बदल केले गेले नाहीत, यात ६ एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ३६०-डिग्री कॅमेरा आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखीच वैशिष्ट्ये आहेत. यात पॅनोरामिक सनरूफ, १०.१-इंच टचस्क्रीन सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, ७-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि कनेक्टेड कार देखील आहे.

MG ZS EV किंमत

या कारची किंमत २७.९० लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg motor has launched a new electric suv for the middle east and north africa mena region the new 2024 mg zs ev pdb
Show comments