MG मोटर इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्स बाजारात सादर करत असते. एमजी मोटर इंडियाने आज आपली दुसरी आणि देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार Comet EVचे सर्व व्हेरीएंट आणि किंमत जाहीर केली आहे. कॉमेट EV कार Pace, Play आणि Plush या तीन ट्रिममध्ये उपलब्ध असणार आहे. एमजी कॉमेट EV टाटाच्या Tiago EV शी स्पर्धा करते. तर या कॉमेट EV बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कधीपासून सुरू होणार डिलिव्हरी ?
MG मोटर्स हे स्पष्ट केले आहे की कॉमेट EV इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी १५ मे २०२३ पासून सुरू होणार आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये १०.२५-इंचाची स्क्रीन असेल, जी टच स्क्रीन युनिट इंफोटेनमेंट युनिट म्हणून काम करते, तर ड्रायव्हरच्या समोरची दुसरी स्क्रीन इन्स्ट्रुमेंटेशनसाठी वापरली जाते. यासोबतच या मॉडेलमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, पुढील आणि मागील एअरबॅग्ज देखील मिळतील. मागील पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्सिंग कॅमेरा, मल्टिपल एअरबॅग्ज, पॉवर-फोल्डिंग ORVM, एलईडी हेडलाइट्स, अॅम्बियंट लाइट, कनेक्टेड कार टेक, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. याला दोन दरवाजा सोबत आणले आहे. ज्यात ४ लोक बसण्याची जागा मिळेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी MG छोटी इलेक्ट्रिक कार १७.३kWh बॅटरी पॅक आणि मागील-एक्सल-माउंट इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज असेल जी ४१.४bhp पॉवर आणि ११०Nm टॉर्क जनरेट करते. चार्जिंगसाठी, MG Comet EV ३.३kW AC चार्जर वापरते. जे फक्त ५ तासात ० टक्के ते ८० टक्के चार्ज होऊ शकते आणि त्याच चार्जरचा वापर करून EV पूर्ण चार्ज होण्यासाठी २ तास लागतात. परिमाणांच्या बाबतीत, MG EV २,९७४ मिमी लांब, १,५०५ मिमी रुंद आहे. तसेच, मॉडेलचा व्हीलबेस फक्त २,०१०mm आहे.याची ड्रायविंग सिंगल चार्जवर रेंज २०० ते २५० किमी पर्यंत असू शकते.
हेही वाचा : BMW चे ‘हे’ दमदार मॉडेल भारतात झाले लॉन्च; अत्याधुनिक फीचर्ससह मिळणार…, जाणून घ्या
काय असणार किंमत ?
एमजी मोटर इंडियाने आज आपली दुसरी आणि देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार Comet EVचे सर्व व्हेरीएंट आणि किंमत जाहीर केली आहे. कॉमेट ev Pace, Play आणि Plush या तीन ट्रिममध्ये उपलब्ध असणार आहे. याची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ७.७८ लाख , ९.२८ लाख अणि ९.९८ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.