देशात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र चार्जिंगची मोठी अडचण समोर येत आहे. यासाठी कंपन्यांनी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आता एमजी मोटर इंडियाने देशभरातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा मजबूत करण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. पुढील ४ ते ५ वर्षांमध्ये भारतातील ग्राहकांच्या सोयीसाठी EV चार्जिंग सोल्यूशन्स प्रदान करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘ग्रीन मोबिलिटी’ वेगाने अंगीकारण्यासाठी बीपीसीएलशी करार करणारी पहिली कार कंपनी असल्याचे एमजीचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले की, “बीपीसीएल सोबतची आमची भागीदारी ही भारतातील इव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी आणि इव्हीवरील ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणखी एक पाऊल आहे.” एमजीच्या “ChangeWhatYouCan” च्या व्हिजनच्या अनुषंगाने BPCL सोबतची ही भागीदारी शहरांतर्गत प्रवासाच्या संधींचा विस्तार करून भारतात EV खरेदी करण्यास गती देईल. BPCL ची भारतातील मजबूत उपस्थिती आणि विस्तीर्ण नेटवर्कमुळे देशभरातील ग्राहकांना चार्जिंगची योग्य सुविधा मिळेल.

एमजी मोटर इंडियाने अलीकडेच “MG Charge” या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत कार निर्माता भारतभरातील निवासी ठिकाणी १,००० एसी फास्ट चार्जर बसवणार आहे. कनेक्टेड एसी चार्जिंग स्टेशन या सोसायटीतील रहिवासी आणि प्रवाशांना सेवा पुरवतील. त्यांच्या EV चार्जिंग स्टेशन चोवीस तास कार्यरत असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg motor india has partnered with bpcl to bolster ev charging infrastructure rmt