करोनामुळे ऑटो क्षेत्रात मंदीचं वातावरण होतं. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा खरेदी विक्रीत तेजी येत असल्याचं दिसत आहे. एमजी मोटर इंडियाने नुकतीच फेब्रुवारी महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ बाजारात ४,५२८ युनिट्सची विक्री झाल्याचं कंपनीने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत यंदा ५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या हेक्टर आणि ग्लोस्टर एसयूव्ही गाड्यांना ग्राहकांनी पसंती दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. आता कंपनीचं लक्ष नव्याने लाँच होणाऱ्या 2022 ZS EV कडे लागून आहे. एमजी मोटरने २०१९ मध्ये हेक्टर एसयूव्ही बाजारात दाखल केली होती. हे मॉडेल विक्रीच्या केंद्रस्थानी आहे. यानंतर पूर्ण इलेक्ट्रिक वाहन ZS EV ची एंट्री झाली. तसेच उत्पादनांमध्ये हेक्टर प्लस, ग्लोस्टर आणि एस्टर यांचा समावेश होता.

एसयूव्ही हे एमजीच्या उत्पादनचा मुख्य आधार आहे, कंपनीने भारताच्या इव्ही चळवळीत मोठी भूमिका बजावत आहे. अद्ययावत ZS EV कडून कंपनीला अपेक्षा आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमजी कंपनीची नवीन ZS EV सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठ्या बॅटरीसह आहे. त्याची क्षमता ५१ किलोवॅट असून पूर्ण चार्ज केल्यावर ४८० किमीपर्यंत धावू शकते. कॉस्मेटिक अपडेट्समध्ये नवीन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पसह स्लीक एलईडी हेडलॅम्प, अपडेटेड फ्रंट बंपर आणि नवीन बॉडी-कलर्ड, ब्लँक-ऑफ ग्रिल यांचा समावेश आहे. मागील कॉस्मेटिक अद्यतनांमध्ये सुधारित एलईडी टेल-लॅम्प आणि मागील बंपर यांचा समावेश आहे. १७-इंचाच्या अलॉय व्हील संच असला तरी प्रोफाइलमध्ये फारसे बदल केले गेले नाहीत. ZS EV फेसलिफ्टला फ्रंट फेंडरवर ‘इलेक्ट्रिक’ बॅज देण्यात आला आहे.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

Jeep Compass Trailhawk 2022 भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

ZS EV च्या सध्याच्या मॉडेलची किंमत २१.४९ लाख- २५.१८ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. सर्व-नवीन उपकरणे आणि मोठा बॅटरी पॅक लक्षात घेता, नवीन ZS EV फेसलिफ्ट अधिक किंमतीत येऊ शकते. लाँच केल्यावर ZS EV चे कोणतेही थेट प्रतिस्पर्धी नसतील, परंतु भविष्यात, ते Hyundai Kona इलेक्ट्रिक फेसलिफ्टशी सामना असेल. ही गाडी या वर्षाच्या शेवटी लाँच होणार आहे.