करोनामुळे ऑटो क्षेत्रात मंदीचं वातावरण होतं. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा खरेदी विक्रीत तेजी येत असल्याचं दिसत आहे. एमजी मोटर इंडियाने नुकतीच फेब्रुवारी महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ बाजारात ४,५२८ युनिट्सची विक्री झाल्याचं कंपनीने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत यंदा ५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या हेक्टर आणि ग्लोस्टर एसयूव्ही गाड्यांना ग्राहकांनी पसंती दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. आता कंपनीचं लक्ष नव्याने लाँच होणाऱ्या 2022 ZS EV कडे लागून आहे. एमजी मोटरने २०१९ मध्ये हेक्टर एसयूव्ही बाजारात दाखल केली होती. हे मॉडेल विक्रीच्या केंद्रस्थानी आहे. यानंतर पूर्ण इलेक्ट्रिक वाहन ZS EV ची एंट्री झाली. तसेच उत्पादनांमध्ये हेक्टर प्लस, ग्लोस्टर आणि एस्टर यांचा समावेश होता.
MG Motors ने फेब्रुवारी महिन्यात देशात ४५०० युनिट्सची केली विक्री, आता लक्ष अपडेटेड ZS EV कडे
एमजी मोटर इंडियाने नुकतीच फेब्रुवारी महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ बाजारात ४,५२८ युनिट्सची विक्री झाल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-03-2022 at 11:43 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg motor sale 4500 units in february rmt